• Download App
    त्रिपुराच्या तरुण मुख्यमंत्र्यांनी करून दाखविलं राज्य चीनी व्हायरस मुक्त | The Focus India

    त्रिपुराच्या तरुण मुख्यमंत्र्यांनी करून दाखविलं राज्य चीनी व्हायरस मुक्त

    फारशी साधने हातात नसतानाही त्रिपुराचे तरुण मुुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी राज्य चीनी व्हायरस मुक्त करून दाखविले आहे. देब यांनी ट्विट करून ही आनंदाची बातमी दिलीआहे. चीनी व्हायरसपासून मुक्त झालेले गोवा आणि मणिपूरनंतर त्रिपुरा हे तिसरे राज्य बनले आहे.  


    वृत्तसंस्था

    आगरतळा : फारशी साधने हातात नसतानाही त्रिपुराचे तरुण मुुख्यमंत्री  बिपलब कुमार देब यांनी राज्य चीनी व्हायरस मुक्त करून दाखविले आहे. देब यांनी ट्विट करून ही आनंदाची बातमी दिलीआहे. चीनी व्हायरसपासून मुक्त झालेले गोवा आणि मणिपूरनंतर त्रिपुरा हे तिसरे राज्य बनले आहे.

    त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी ट्विट करत राज्य कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्रिपुरात कोरोनाचे दोन रुग्ण होते. हे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता कोरोनमुक्त झाले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी याविषयी माहिती देताना, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस दल आणि सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

    बिपलब यांनी सांगितले की, सगळे नागरिक सोशल डिस्टिन्शिंग आणि सरकारी गाइडलाइन पाळत आहेत. यामुळे मी सगळ्याच नागरिकांना घरी रहा आणि सुरक्षित राहा, अशी विनंती करतो.

    त्रिपुरामध्ये फारशी साधने नव्हती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा अभिनव पध्दतीने वापर केला. लोकांना सातत्याने प्रेरीत केले. मास्क नसल्याच्या तक्रारी आल्यावर त्यांनी लोकांना पारंपरिक साधनांचा वापर करण्याचे आवाहन केले.

    यासाठी त्यांनी स्वत: एक व्हिडीओ बनविला होता. याठिकाणी गमझासारखे एक पारंपरिक कापड सगळे जण वापरतात. त्याचाच मास्कसारखा उपयोग करण्याचे आवाहन केले. त्याने कशा पध्दतीने चेहरा झाकायचा हे देखील दाखविले होते. यासारख्या साध्या गोष्टींतून त्रिपुरातील जनतेने चीनी व्हायरसवर मात केली.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का