• Download App
    कोरोना चौकशीला सामोरे जाण्यास चीन तयार; तरी हेकडी कायम | The Focus India

    कोरोना चौकशीला सामोरे जाण्यास चीन तयार; तरी हेकडी कायम

    • १२० देशांच्या दबावामुळे चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन
    • २ अब्ज डॉलरची मदत जाहीर करून WHO च्या प्रशासकीय व्यवस्थेत मेख मारून ठेवली

    विशेष प्रतिनिधी

    बीजिंग : कोरोनाचा उगम नेमका कसा आणि कोठे झाला याचा तपास करण्यासाठी जगभरातून निर्माण झालेल्या दबावासमोर अखेर चीनने मान तुकविली आहे. पण कोरोनाची माहिती पहिल्यांदा लपविणे आणि WHO वर दबाव आणून संघटनेलाही माहिती लपविण्यास भाग पाडणे हे आरोप फेटाळत चीनचे अध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी हेकडी कायम ठेवली आहे.

    कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्यासाठी होणाऱ्या चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन चीनने दिले. या संबंधीच्या युरोपियन महासंघाच्या प्रस्तावाला त्याने मान्यता दिली. यापूर्वी चीनने अशा कोणत्याही चौकशीला सहकार्य न करण्याची ताठर भूमिका घेतली होती. भारतानेही ही चौकशी झाली पाहिजे असा आग्रह धरला होता. अखेर चीनने या प्रकरणी माघार घेतली. पण त्याच वेळी WHO साठी २ अब्ज डॉलरच्या मदतीची घोषणा करून WHO च्या प्रशासकीय व्यवस्थेत मेख मारून ठेवण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

    कोरोनाचा जगभर प्रसार चीनमुळेच झाला असा आरोप आहे. काही तज्ञांनी हा विषाणू चीननेच निर्माण केला आहे, असेही प्रतिपादन केले आहे. त्यामुळे हा विषाणू नेमका कोठे असा जन्मला आणि त्याचा जन्मदाता कोण आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी जगभरातून केली जात होती.

    युरोपियन महासंघाच्या प्रतिनिधीने चौकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव WHO मध्ये मांडला होता. भारतही या महासभेचा सदस्य आहे. या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले त्यावेळी भारतानेही प्रस्तावाचे समर्थन केले. सुरवातीला समर्थन करणाऱ्या सदस्य देशांची संख्या ६२ होती. नंतर ती १२० पर्यंत वाढली. प्रस्तावात चीनचे नाव उघडपणे घेण्यात आले नसले तरी रोख चीनकडेच आहे हे स्पष्ट होत आहे. बहुतेक सर्व राष्ट्रांनी या प्रस्तावाचे समर्थन केल्याने चीनचा नाईलाज होऊन त्याने चौकशीला मान्यता दिली आहे

    मूळ विषाणू केले नष्ट
    कोरोनाचे मूळ विषाणू आपण नष्ट केल्याची कबुली चीनने काही दिवसांपूर्वी दिली आहे. मात्र चीन जगाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आजही चीनमध्ये या विषाणूवर प्रयोग सुरू आहेत. एकतर चीनने हेतुपुरस्सर जगात हा विषाणू पसरविला किंवा या विषाणूच्या घातकतेची माहिती जगाला वेळेवर दिली नाही. म्हणजेच हे चीनचेच कारस्थान असावे किंवा निष्काळजीपणा तरी असावा असा आरोप जवळजवळ सर्व देश करीत आहेत. त्यामुळे चीनची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी आग्रही मागणी असून अमेरिकेने चीनविरोधी आघाडीत पुढाकार घेतला त्याला सर्व देशांचा पाठिंबा मिळाला आहे.

    Related posts

    नड्डांवर बॅनर्जींची मानभावी “ममता”; कोरोनातून बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा

    पवारांना संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या “सारथी” शुभेच्छा

    मोदी सरकारविरोधातील संघर्षात ममतांचा संघराज्य व्यवस्थेलाच धक्का