विशेष प्रतिनिधी
मुंबई : गृहमंत्रालयाने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता झेड प्लस सुरक्षा समीर वानखेडेंना देण्यात येणार आहे. समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन नवनवे आरोप केले आहेत.तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या देखील मिळत आहेत. Z plus SAMEER WANKHEDE
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. समीर वानखेडेंना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे.
कोणाला सुरक्षा पुरवली जाते Z+ ?
प्रसिद्ध राजकीय नेते, कलाकार, उद्योजक आणि क्रीडापटू यांना सरकारकडून सुरक्षा दिली जाते. त्यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना कुठल्या दर्जाची सुरक्षा द्यायची, याचा निर्णय सरकारकडून घेतला जातो.एक्स, वाय, झेड आणि एसपीजी कमांडो असे सुरक्षेचे विविध प्रकार आहेत.
Z+ SAMEER WANKHEDE
महत्त्वाच्या बातम्या
- SAMEER WANKHEDE : समीर वानखेडेंच्या आई-बहिण यानंतर आता वडिलांनाही ओढले वादात ! नवाब मलिक म्हणतात ‘ज्ञानदेव’ की ‘दाऊद’ ?पोस्ट केला आणखी एक फोटो
- वसुली हा विरोधकांचा एकमेव धंदा; स्मृती इराणी यांची दादरा नगर हवेलीत प्रचार सभेत शिवसेनेवर टीका
- बांगलादेशात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची हिंदू-मुस्लीम आरोपींची कबुली
- काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची शोध मोहीम पंधराव्या दिवशीही सुरूच