वृत्तसंस्था
श्रीनगर : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याच्या इराद्याने जम्मू- काश्मीरची राजधानी श्रीनगर येथून एक युवक दिल्लीकडे चालत निघाला आहे. फाहिम नजीर शाह , असे त्याचे नाव असून तो मोदी यांचा अस्सीम चाहता असल्याचे सांगतो.Youth hopes to meet Prime Minister Narendra Modi; The journey from Srinagar to Delhi will be 850 km on foot
श्रीनगर ते दिल्ली हे अंतर सुमारे ८५० किलोमीटर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला मिळावे यासाठी त्याचा हा खटाटोप सुरु आहे. पदयात्रा काढून त्याला मोदी यांचे लक्ष त्याला आपल्याकडे वळवायचे आहे.
जम्मू-काश्मीरची श्रीनगरमध्ये अर्धवेळ इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारा २८ वर्षीय फाहिम नजीर शाह म्हणाला, “मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा चाहता आहे. मला त्याची समक्ष भेट घ्यायची आहे.”
२०० किमी चालल्यानंतर रविवारी तो उधमपूरला पोचला. दोन दिवसांपूर्वी त्याने प्रवासाला सुरुवात केली होती.
श्रीनगरमधील शालीमार परिसरात तो राहतो. शहा याला विश्वास आहे की, या कठीण प्रवासानंतर त्याचे पंतप्रधानांना भेटण्याचे स्वप्न पूर्ण होईल. शहा म्हणाला की, ते गेल्या चार वर्षांपासून पंतप्रधानांना सोशल मीडियावर फॉलो करत आहेत आणि त्यांचे भाषण आणि कृती माझ्या हृदयाला स्पर्श करतात. त्यामुळे मला त्यांची समक्ष भेट घ्यायची आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, ती मिळाली नाही.
एका घटनेची आठवण करून देताना तो म्हणाला, पंतप्रधान एका सभेत बोलत होते. तेव्हा अचानक ‘अजान’चा पुकारा झाला. तेव्हा काही क्षण मोदी यांनी आपले भाषण थांबविले. त्यांची ही कृती मला अतिशय भावली.
गेल्या अडीच वर्षांपासून मी मोदी यांची भेट घेण्यासाठी धडपडत आहे. दिल्ली येथे आणि जम्मू काश्मीर दौऱ्यावेळी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा सुरक्षारक्षकांनी मला त्यांना भेटू दिले नाही. पंतप्रधानांच्या कार्याने मी अतिशय प्रभावित झालो आहे. जम्मू-काश्मीरचे ३७० कलम हटवून हा भाग केंद्र शासित केल्यामुळे खऱ्या अर्थाने तेथे विकासाला मोठी चालना मिळाली आहे. एकंदर तेथे विकासाचे मोठे पर्व सुरु झाले आहे, असे तो म्हणाला.
Youth hopes to meet Prime Minister Narendra Modi; The journey from Srinagar to Delhi will be 850 km on foot
महत्त्वाच्या बातम्या
- अफगणिस्थानमधून भारतीय नागरिकांची सुरक्षित सुटका, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक
- भूसंपादनातील विलंब, वन आणि पर्यावरण मंत्रालयांच्या मंजुरीअभावी रखडलेत ४८३ प्रकल्प, ४.४३ ला रुपये खर्च जादा होणार
- ३७०च्या दणक्यानंतर केंद्राचा नवा दंडुका… हुर्ऱियतच्या दोन्ही गटांवर बंदी घालून कंबरडे मोडणार
- निर्वासितांच्या बुरख्याखाली दडलेले अफगाण दहशतवादी स्वीकारणार नाही… रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांचा अमेरिका व युरोपीय देशांना कडाडून विरोध