• Download App
    योदी आदित्यनाथ सरकारने जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती, विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु । Yogi govt. declares schemes for farmers

    योगी आदित्यनाथ सरकारने जाहीर केल्या शेतकऱ्यांसाठी अनेक सवलती: विधानसभेची जंगी तयारी सुरु

    वृत्तसंस्था

    लखनौ : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांनी अनेक योजना जाहीर केल्या. शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या थकबाकीसाठी तडजोड योजनेसह त्यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे घेण्याचाही यात समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जाते. Yogi govt. declares schemes for farmers

    वीजबिल थकल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. त्याचप्रमाणे, या थकबाकीचे व्याज माफ करण्याची योजनाही राबविली जाणार आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, की ऊसाची किंमतही राज्य सरकारकडून वाढविली जाईल. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.



    राज्याच्या पश्चिम भागातील साखर कारखाने २० ऑक्टोबरपासून तर पूर्व भागातील कारखाने २५ ऑक्टोबरपासून सुरू होतील. शेतकऱ्यांच्या ऊसाची २०१० पासून १.४२ लाख कोटी रुपयांची थकबाकी असून पुढील गळीत हंगाम सुरू होण्याआधी ती दिली जाईल. कोरोना काळातही राज्य सरकारने ५६ लाख टन गहू किमान आधारभूत किमतीला खरेदी केला, अशी माहितीही त्यांनी दिली.

    Yogi govt. declares schemes for farmers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य