• Download App
    योगी आदित्यनाथ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास|Yogi Adityanath will take the state to new heights of development, believes Prime Minister Narendra Modi

    योगी आदित्यनाथ राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही वर्षांत ते राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सलग दुसºया विजयानंतर योगी आदित्यनाथ यांनी राजधानी दिल्लीच्या त्यांच्या पहिल्या भेटीत मोदींची भेट घेतली.Yogi Adityanath will take the state to new heights of development, believes Prime Minister Narendra Modi

    यानंतर नरेंद्र मोदींनी ट्विट केले की, आज योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. उत्तर प्रदेश निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पाच वर्षांत त्यांनी जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आगामी काळात ते राज्याला विकासाच्या आणखी उंचीवर नेतील याची मला खात्री आहे.



    शपथविधी समारंभाच्या अगोदर योगी आदित्यनाथ भाजपच्या प्रमुख नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आहेत. होळीनंतर शपथविधी होण्याची शक्यता आहे. आदल्या दिवशी योगींनी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि भाजपचे सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांचीही भेट घेतली.

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या ४०३ पैकी २५५ जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यांच्या दोन मित्रपक्षांनी १८ जागा जिंकल्या आहेत. राजकीय विश्लेषकांचे मत आहे की या विजयामुळे आदित्यनाथ यांचा कौल वाढला आहे. कारण, राज्यात भाजपच्या पुन्हा विजयाच्या प्रयत्नांमध्ये त्यांचे नेतृत्व केंद्रस्थानी होते.

    Yogi Adityanath will take the state to new heights of development, believes Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न