• Download App
    योगासने, मसाले व तेलविरहित भोजन हेच १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य। Yoga, spices and oil-free food is the secret of longevity of 125 year old Swami Sivananda

    योगासने, मसाले व तेलविरहित भोजन हेच १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पद्मश्री सन्मानप्राप्त स्वामी शिवानंद हे १२५ वर्षांचे आहेत. त्यांच्या दीर्घआयुष्याचे रहस्य त्यांच्या दिनचर्येत दडले आहे. Yoga, spices and oil-free food is the secret of longevity of 125 year old Swami Sivananda

    योगाचार्य असलेले शिवानंद यांना सोमवारी पद्मश्री सन्मानाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरविण्यात आले. योगाचार्य शिवानंद यांचा जन्म १८९६ मध्ये सिल्हेत जिल्ह्यात (सध्याचा बांगलादेश ) झाला. त्यांनी योग प्रसारात अमूल्य योगदान दिले असून त्याला दिनचर्येचा भाग बनविले आहे. मसाले आणि तेल विरहित भोजन ते घेतात. गेली ५० वर्षे त्यांनी हा नियम पाळला आहे.



    जगन्नाथ पुरीचे रहिवासी असलेले शिवानंद हे ४०० ते ६०० कुष्ठग्रस्त भिकाऱ्यांची सेवा करतात. त्यांना अन्न आणि कपडे अन्य जीवनावश्यक वस्तू ते पुरवितात. योगासनांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यामुळे दीर्घआयुष्य मला प्राप्त झाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे कोणाच्याही आधाराशिवाय या वयात ते पद्मश्री सन्मान घेताना दिसले. त्यातूनच भारतीय जीवशैली उत्कृष्ठ असल्याचे सिद्ध झाले असून योगसनाचे महत्व जीवनात अधिक असल्याचे अधोरेखित झाले आहे.

    Yoga, spices and oil-free food is the secret of longevity of 125 year old Swami Sivananda

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही