• Download App
    जगप्रसिद्ध फूटबॉलपटू दिएगो मॅराडोनांचे मौल्यवान घढ्याळ सापडले चक्क आसामात|Wrist watch of maredona found in Assam

    जगप्रसिद्ध फूटबॉलपटू दिएगो मॅराडोनांचे मौल्यवान घढ्याळ सापडले चक्क आसामात

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी – अर्जेंटिनाचे जगप्रसिद्ध दिवंगत फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांची काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेले मौल्यवान घड्याळ आसामच्या चराईदेव जिल्ह्यातून जप्त करण्यात आली आहे.Wrist watch of maredona found in Assam

    या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी ही माहिती दिली. हे घड्याळ ‘हब्लो’ या कंपनीचे असून त्याची किंमत १९ लाख रुपये एवढी आहे.



    वाजिद हुसैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा शिवसागर जिल्ह्याचा रहिवासी आहे. मॅराडोना याच्या साहित्याचा संग्रह करणाऱ्या एका कंपनीमध्ये तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो ऑगस्ट २०१२ मध्ये भारतात आला होता. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्याने दुबईमधून पळ काढला होता.

    आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरीप्रकरणी काही दिवसांपूर्वीच दुबईच्या पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. स्थानिक पोलिसांनी यानंतर कारवाईला वेग देताना आरोपीला मोरनहाट परिसरातून त्यांच्या सासुरवाडीत बेड्या ठोकल्या होत्या.

    Wrist watch of maredona found in Assam

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे