विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी – अर्जेंटिनाचे जगप्रसिद्ध दिवंगत फूटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांची काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेले मौल्यवान घड्याळ आसामच्या चराईदेव जिल्ह्यातून जप्त करण्यात आली आहे.Wrist watch of maredona found in Assam
या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी ही माहिती दिली. हे घड्याळ ‘हब्लो’ या कंपनीचे असून त्याची किंमत १९ लाख रुपये एवढी आहे.
वाजिद हुसैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा शिवसागर जिल्ह्याचा रहिवासी आहे. मॅराडोना याच्या साहित्याचा संग्रह करणाऱ्या एका कंपनीमध्ये तो सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. तो ऑगस्ट २०१२ मध्ये भारतात आला होता. वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्याने दुबईमधून पळ काढला होता.
आसाम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरीप्रकरणी काही दिवसांपूर्वीच दुबईच्या पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. स्थानिक पोलिसांनी यानंतर कारवाईला वेग देताना आरोपीला मोरनहाट परिसरातून त्यांच्या सासुरवाडीत बेड्या ठोकल्या होत्या.
Wrist watch of maredona found in Assam
महत्त्वाच्या बातम्या
- लावालावी करणे हेच संजय राऊत यांचे काम, नारायण राणे यांची टीका
- मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करणार, मुस्लिम समाजाने घेतला निर्णय
- सौदी अरेबियानेही मानले तबलिगी दहशतवादाचे प्रवेशद्वार, तबलिगी जमातवर सौदी अरेबियात बंदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांना भेट, शरयू प्रकल्पाचे काम पूर्ण, १४ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार