प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या कुस्तीपटूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यात विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या नामवंत कुस्तीपटूंचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी रविवारी (28 मे) संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या विरोधक कुस्तीपटूंना पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी ही कारवाई केली.Wrestlers’ protest: FIR filed against Bajrang Punia, Sakshi and Vinesh under these sections including inciting riots
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही पहिलवान रात्री उशिरा जंतरमंतरवर आले होते; मात्र त्यांना परवानगी न मिळाल्याने परत पाठवण्यात आले.
नवा इतिहास लिहिला जातोय – विनेश
एफआयआरला उत्तर देताना विनेश फोगाट म्हणाली की, नवा इतिहास लिहिला जात आहे. फोगटने आपल्या ट्विटर पेजवर लिहिले आहे, “आमचे लैंगिक शोषण करणाऱ्या बृजभूषण विरोधात एफआयआर नोंदवायला दिल्ली पोलिसांना 7 दिवस लागले आणि शांततेने आंदोलन केल्यामुळे आमच्याविरोधात एफआयआर नोंदवायला 7 तासही लागले नाहीत. या देशात हुकूमशाही सुरू झाली आहे का? सरकार आपल्या खेळाडूंशी कसे वागते हे सारे जग पाहत आहे. नवा इतिहास लिहिला जात आहे.”
बजरंग पुनियाचा अटकेवर सवाल
रविवारी (२८ मे) आंदोलक कुस्तीपटूंनी संसद भवनासमोर महिला सन्मान महापंचायतीची घोषणा केली होती. पोलिसांनी ही परवानगी दिली नाही. असे असूनही कुस्तीपटूंनी संसदेच्या दिशेने ‘शांततापूर्ण मोर्चा’ काढला, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांना काही तासांनंतर सोडण्यात आले तर पुनियाला रात्री उशिरा सोडण्यात आले. पुनियाने आपल्या पोलीस कोठडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुनियाने ट्विटरवर लिहिले की, मी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. काहीही सांगत नाहीयेत. मी काही गुन्हा केला आहे का? बृजभूषण तुरुंगात असायला हवे होते. आम्हाला तुरुंगात का ठेवले आहे?
या कलमान्वये गुन्हा दाखल
ज्या कलमांतर्गत खेळाडूंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये कलम 147 (दंगल), कलम 149 (बेकायदेशीर सभा), 186 (लोकसेवकाला कर्तव्यात अडथळा आणणे), 188 (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा करणे), 332 , 353 सह, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गतदेखील आरोप ठेवण्यात आले आहेत.
जंतरमंतर येथे आंदोलनाची सांगता
कुस्तीपटूंवर कारवाई करण्याबरोबरच पोलिसांनी जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरील सर्व सामान हटवले असून जागा स्वच्छ करण्यात आली आहे. याचा अर्थ आता खेळाडू परत धरणे देऊ शकणार नाहीत.
Wrestlers’ protest: FIR filed against Bajrang Punia, Sakshi and Vinesh under these sections including inciting riots
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन सावरकरांच्या नावे शौर्य पुरस्कार देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
- एर्दोगान पुन्हा एकदा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष, सलग अकराव्यांदा राज्याभिषेक होणार
- पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडून खेचून घ्यायचा राष्ट्रवादीचा चंग; अजितदादांचा आग्रह!!
- नव्या संसदेत सेंगोल, चाणक्य आणि अखंड भारताचा नकाशा; “कबुतरी शांती”ला फाटा देत गरुड झेपेची आशा!!