• Download App
    टोकियो ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पहिलवान रवी दहियाला रौप्य पदक Wrestler Ravi Dahiya gets Silver medal loses to ROC's Zavur Uguev in men's Freestyle 57 kg final.

    टोकियो ऑलिंपिकमध्ये कुस्तीत पहिलवान रवी दहियाला रौप्य पदक

    वृत्तसंस्था

    टोकियो – टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलवान रवी दहिया याने आज रौप्य पदक पटकावले. या ऑलिंपिकमध्ये एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकणाऱ्या भारताला सुवर्णपदकाचे वेध लागले होते. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियन ऑलिंपिक कमिटीच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ने जिंकली. Wrestler Ravi Dahiya gets Silver medal loses to ROC’s Zavur Uguev in men’s Freestyle 57 kg final.

    त्यामुळे रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तरीही भारताच्या खात्यात अजून एका महत्त्वाच्या पदकाची नोंद झाली आहे. रवीच्या रौप्य पदकामुळे भारताने मिळविलेल्या रौप्य पदकांची संख्या दोन झाली आहे. या आधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने रौप्य पदक पटकावले आहे.

    रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. म्हणजे त्याने नूरिस्लामला सामन्यातूनच बाहेर फेकले होते.

    आजच्या लढतीत रवी आणि युगुयेवे दोघेही सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. यापूर्वी या दोघांची लढत २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झाली होती. त्यानंतर रशियन पहिलवानाने भारतीय कुस्तीपटूला चुरशीच्या सामन्यात ६-४ ने पराभूत केले. या स्पर्धेत रवीला कांस्यपदक मिळाले. रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले.

    कुस्तीपटू सुशील कुमारने भारताला ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून दिली होती. सुशीलने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. रवीच्या आधी भारताने कुस्तीमध्ये ५ पदके जिंकली आहेत. सुशीलव्यतिरिक्त योगेश्वर दत्तने २०१२मध्ये कांस्य, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्य जिंकले. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिला कुस्तीपटू होते. १९५२च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.

    Wrestler Ravi Dahiya gets Silver medal loses to ROC’s Zavur Uguev in men’s Freestyle 57 kg final.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!