• Download App
    कलम ३७० हटविले तसे देशातून निजाम आणि ओवेसींचे नावही नष्ट होईल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे प्रतिपादन|With the deletion of Article 370, the names of Nizam and Owaisi will be erased from the country, states Assam Chief Minister Hemant Biswa Sarma.

    कलम ३७० हटविले तसे देशातून निजाम आणि ओवेसींचे नावही नष्ट होईल, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    हैद्राबाद : ज्या पद्धतीने कलम-३७० हटवलं गेलं, जसं राम मंदिर आता उभारण्याचे काम वेगानं सुरू आहे तसेच येथेही निजाम आणि ओवेसींचं नाव कायमचं नष्ट केलं जाईल. तो दिवस आता दूर नाही, असे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.With the deletion of Article 370, the names of Nizam and Owaisi will be erased from the country, states Assam Chief Minister Hemant Biswa Sarma.

    तेलंगणातील वारंगलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना सरमा म्हणाले, भारतात आता खोटारड्या धरनिरपेक्ष व धार्मिक राजकारण करणाºयांना कधीच खपवून घेणार नाही. बाबर, औरंगजेब आणि निजाम जास्तवेळ टिकू शकले नाहीत हा भारताचा इतिहास आहे.



    निजामांचं संपूर्ण अस्तित्व नष्ट होईल आणि भारतीय सभ्यतावर आधारित नवी संस्कृती जन्माला येईल.तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधताना सरमा म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही.

    आपल्याला अन्यायाविरोधात लढायचं आहे. काहीही झाले तरी अन्यायासोबत तडजोड करायची नाही. आपले कार्यकर्ते आता तयार आहेत. त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. कष्टाचं फळ नेहमी गोड असते. ज्यावेळी ते आपल्यावर हल्ला करतील त्यावेळी नवीन तेलंगणाची निर्मिती होईल.

    त्यामुळे तुम्हाला सर्वांना लढायचे आहे. जेव्हा एखादा हुकूमशाह मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान होतो तेव्हा देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण होते. त्यासाठी आपल्याला लढत राहावे लागेल.

    इंदिरा गांधींसारख्या हुकुमशहाला समुद्रात फेकलं होतं. आता इथं समुद्र तयार आहे आणि कोणाला समुद्रात फेकायचं आहे ते तेलंगणावासियांना माहिती आहे. भारतानं हुकूमशाहीला विरोध केला होता. भविष्यात देखील हुकूमशाही चालणार नाही.

    With the deletion of Article 370, the names of Nizam and Owaisi will be erased from the country, states Assam Chief Minister Hemant Biswa Sarma.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य