भाजपा नेत्यांची भेट घेतल्याचा दावाही केला जात आहे.
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : एकामागून एक नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या मॅरेथॉनमध्ये पंजाबमधूनही पक्षाला धक्का बसेल, अशी अटकळ बांधली जात आहे. माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एवढंच नाही तर त्यांनी पंजाबमधील काही भाजपा नेत्यांची भेट घेतल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, चन्नी यांच्या जवळच्या सूत्रांनी याचा इन्कार केला आहे. असे असले तरी राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. Will Charanjit Singh Channi join BJP Strong Gossips in political circles
पंजाब विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी ही चर्चा फेटाळली आहे. बाजवा यांनी भाजपावर खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, या प्रकरणाबाबत भाजपाचे प्रवक्ते अनिल सरीन म्हणतात की, त्यांना अशा कोणत्याही घडामोडींची माहिती नाही.
चन्नींबद्दल चर्चा का?
जालंधर लोकसभा पोटनिवडणूक आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पतियाळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर चन्नीबाबत अफवांचा बाजार तापला आहे. कट्टर प्रतिस्पर्धी सिद्धू तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चन्नी राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अलीकडेच पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर सिंग वारिंग यांनीही चन्नी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी पंजाब विजिलेंसने शुक्रवारी लुकआउट नोटीस जारी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चन्नी हे परदेशात जाणार होते, मात्र त्याआधीच सर्व विमानतळांवर दक्षता विभागाने त्यांच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी केली होती. या अंतर्गत चन्नी आता परदेशात जाऊ शकणार नाहीत. चन्नी यांच्यावर सरकारी तिजोरीचा वापर खासगी कामांसाठी केल्याचा आरोप आहे.
Will Charanjit Singh Channi join BJP Strong Gossips in political circles
महत्वाच्या बातम्या
- आज PM मोदी एकाच वेळी करणार दोन वंदे भारताचे लोकार्पण, या राज्यांतील प्रवाशांना मिळणार लाभ
- अदानींच्या समर्थनाचे पवारांचे वक्तव्य, काँग्रेस हायकमांडला टोचून महाराष्ट्रातल्याच महाविकास आघाडीला सुरुंग!!
- सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर ढकलेले काँग्रेस नेतृत्व अदानी मुद्द्यावर पवारांच्या मुलाखतीच्या डावपेची राजकारणापुढे झुकेल??
- नऊ वर्षांत तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी; प्रत्येकाचं कारण मात्र एकच ते म्हणजे…