• Download App
    पुदुच्चेरीत नारायणस्वामी यांनाच तिकीट नाकारले, कॉंग्रेसच्य नेतृत्वावारून तर्कवितर्कांना उधाण।Who will lead congress in puduchery

    पुदुच्चेरीत नारायणस्वामी यांनाच तिकीट नाकारले, कॉंग्रेसच्य नेतृत्वावारून तर्कवितर्कांना उधाण

    वृत्तसंस्था

    पुदुच्चेरी : माजी मुख्यमंत्री आणि येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते व्ही. नारायणस्वामी यांना पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याचे समजत असून त्यामुळे पक्षात नाराजी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आता नारायणस्वामी नाहीत, तर पक्ष कोणाकडे नेतृत्व देणार याचे आखाडे बांधले जात आहेत. Who will lead congress in puduchery

    यावरून राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नारायणस्वामी यांना पक्षाने निवडणू्क प्रचाराची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली आहे. पुदुच्चेरीमध्ये नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यकाल पूर्ण करण्याआधीच कोसळल्याने हा बदल केला असल्याचे समजते. काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीतही नारायणस्वामी यांचे नाव नसल्याने ते निवडणूक लढविणार नसल्याचे काँग्रेसने जाहीर केले होते.



    नारायणस्वामी यांनी मात्र आपल्याला तिकीट नाकारल्याचा दावा केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुदुच्चेरीच्या दौऱ्यावर असताना नारायणस्वामी यांनी एका महिलेने केलेल्या तक्रारीचे चुकीचे भाषांतर राहुल यांना सांगितले होते. अडचणीत कोणताही नेता मदतीला येत नाही, नारायणस्वामीही येत नाहीत, अशी तक्रार महिलेने केली होती. याचे भाषांतर करताना नारायणस्वामी यांनी मात्र स्वत:ची पाठ थोपटणारी वाक्ये राहुल यांना सांगितली. हा प्रकार नंतर राहुल यांना लक्षात आणून दिला गेला. त्यामुळेही नारायणस्वामी केंद्रीय नेतृत्वाच्या नजरेतून उतरल्याचे सांगितले जाते.

    Who will lead congress in puduchery

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी