विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – आसासमध्ये भाजपमधेय आता मुख्यमंत्रीपदावरून मोठी रस्सीखेच सुरु झाली आहे. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि या पदासाठी प्रबळ दावेदार असलेले आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्यातील रस्सीखेच संपत नसल्याचे पाहून भाजप नेतृत्वाने दोघांनाही दिल्लीत बोलावून त्यांचे बौद्धीक घेतल्याचे समजते. Who will became CM in Assam
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दोन्ही नेत्यांना काय सांगितले याबाबत उत्कंठा वाढली आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला का, हे अद्याप अंधारात आहे. सोनोवाल ही भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाची नेतृत्वाची पहिली पसंती असली तरी हिमंत बिस्वा शर्मा यांच्या महत्त्वाकांक्षेने ही उसळी घेतली आहे.
शर्मा यांना पाच वर्षांपूर्वी काँग्रेसमधून फोडताना भाजपच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखविल्याचे सांगितले जाते. पाच वर्षे वाट पाहिल्यानंतर शर्मा यांच्या संयमाचा कडेलोट होण्यासारखी परिस्थिती उद्भवली आहे. त्यांनी निवडणुकीच्या पूर्वीच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली होती. त्यामुळेच भाजपने आसाममध्ये यंदा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे टाळले होते.
निवडणुकीनंतर भाजपला १२६ सदस्यांच्या विधानसभेत ६० जागांसह बहुमत मिळाले. मात्र सोनोवाल आणि शर्मा यांच्या संघर्षामुळे आठवडा उलटूनही आसाममध्ये मुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊ शकलेला नाही.
Who will became CM in Assam
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या कोरोना मॉडेलमागे काळंबेरं, आकडेवारी उजेडात येऊ दिली जात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
- कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी
- मागासवर्गीय आयोगाच्या अहवालातील चार हजार पाने गायब, भाजपााचा धक्कादायक आरोप
- डीआरडीओच्या या औषधामुळे कोरोना अडीच दिवस अगोदर होतो बरा