• Download App
    व्हॉटसअ‍ॅपने केली २० लाखांहून अधिक खाती बंद, भारतातील आयटी नियमांचे केले होते उल्लंघन|WhatsApp closes more than 20 lakh accounts, violates IT rules in India

    व्हॉटसअ‍ॅपने केली २० लाखांहून अधिक खाती बंद, भारतातील आयटी नियमांचे केले होते उल्लंघन

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतातील आयटी नियमांचे तसेच व्हॉटसअ‍ॅपच्या सेवा अटींचे उल्लंघन करणारी २० लाखांहून अधिक खाती बंद करण्यात आली आहेत. व्हॉटसअ‍ॅपच्या मासिक अनुपालन अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे.WhatsApp closes more than 20 lakh accounts, violates IT rules in India

    व्हॉट्सअ‍ॅपने भारतात १६ जून ते ३१ जुलैपर्यंत 3 लाख खाती बंद केली होती. ५९४ तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जगभरात सरासरी ८ कोटी खात्यांवर व्हॉट्सअ‍ॅपने बंद केली आहेत. परवानगीशिवाय स्वयंचलित किंवा बल्क संदेश पाठवण्यासाठी २० लाख ७० हजार खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे.



    अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपकडे ४२० तक्रारी आल्या होत्या. यामध्ये अकाउंट सपोर्टच्या १०५ तक्रारी, बंदी अपीलच्या२२, प्रॉडक्ट सपोर्टच्या ४२, सिक्युरिटीच्या १७ आणि इतर सपोर्टच्या ३४ तक्रारींचा समावेश आहे.

    व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूजर सिक्युरिटी रिपोर्टमध्ये तक्रारी देण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आपली कारवाई सुरू ठेवेल. प्लॅटफॉर्मवर स्पॅम आणि नको असलेले संदेश रोखण्यावर आमचा भर आहे. ते तक्रार चॅनेलद्वारे वापरकर्त्यांच्या तक्रारींची नोंदणी करते. मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर हानिकारक वर्तन टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने आणि संसाधने वापरते.

    भारत सरकारने २६ मे रोजी नवीन आयटी नियम लागू केले होते. या नियमांनुसार, ५० लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेले कोणतेही डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्येक महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे. या अहवालात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यांच्या आधारे केलेल्या कारवाईची माहिती द्यावी लागेल.

    व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, कोणत्याही वापरकत्यार्चे संदेश वाचले जात नाही. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये, वापरकर्त्यांची माहिती संरक्षित आहे. प्लॅटफॉर्म ऑपरेशनसाठी उपलब्ध नसलेल्या एनक्रिप्टेड माहितीवर अवलंबून आहे. यामध्ये यूजर रिपोर्ट, प्रोफाइल फोटो, ग्रुप फोटो आणि ग्रुप डिस्क्रिप्शन सामिल आहे.

    WhatsApp closes more than 20 lakh accounts, violates IT rules in India

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची