• Download App
    गांधी-नेहरु-कलाम यांच्या देशात बाबरी मशीद उध्वस्त केल्याची कोणाला लाजही वाटत नाही; पी. चिदंबरम यांचे वादग्रस्त वक्तव्यWhatever Gandhiji thought was 'RamRajya' is no longer the 'RamRajya' understood by many. What Pandit Ji told us about secularism is not the secularism understood by many

    गांधी-नेहरु-कलाम यांच्या देशात बाबरी मशीद उध्वस्त केल्याची कोणाला लाजही वाटत नाही; पी. चिदंबरम यांचे वादग्रस्त वक्तव्य

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या देशात स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेल्यानंतर बाबरी मशीद कुणीच उध्वस्त केली नाही हे म्हणायला आपल्याला लाज देखील वाटत नाही, अशा शब्दात माजी केंद्रीय गृहमंत्री अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भाजप आणि संघ परिवाराचे वाभाडे काढले.Whatever Gandhiji thought was ‘RamRajya’ is no longer the ‘RamRajya’ understood by many. What Pandit Ji told us about secularism is not the secularism understood by many

    माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी लिहिलेल्या “अयोध्या व्हर्ङिक्ट” या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी यावेळी सावरकर आणि हिंदुत्व या विषयावर विविध वादग्रस्त विधाने करून नव्या वादाला तोंड फोडले. त्याच वेळी चिदंबरम यांनी पंडित नेहरू आणि धर्मनिरपेक्षता या विषयावर आपली मते व्यक्त केली.

    चिदंबरम म्हणाले, की हा देश महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि एपीजे अब्दुल कलाम यांचा आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटून गेली आहेत आणि तरी देखील आपल्याला हे म्हणायला लाज देखील वाटत नाही की बाबरी मशीद कुणीच उद्ध्वस्त केली नाही. याचा अर्थ ती उध्वस्त केल्याची जबाबदारी घ्यायला कोणीच पुढे येत नाही. ही खरेतर शरमेची बाब आहे. अयोध्येचा वाद दीर्घ काळ चालला होता. भरपूर मोठा काळ उलटून गेल्यामुळे अयोध्येसंदर्भातल्या वादावरचा सुप्रीम कोर्टाचा निकाल दोन्ही बाजूंनी स्वीकारला. याचा अर्थ असा नव्हे, की तो निकाल योग्य होता म्हणून दोन्ही बाजूंनी स्वीकारला तर वस्तुस्थिती ही आहे की दोन्ही बाजूंनी एकदाचा निकाल स्वीकारल्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्याला “योग्य” मानावा लागत आहे, असे वक्तव्य पी चिदंबरम यांनी केले.

    चिदंबरम यांच्या दोन्ही वक्तव्यांमधून नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर चिदंबरम यांनी भाष्य केल्याने याचे कायदेशीर कोणते परिणाम होतील यावर देखील देशात चर्चा सुरू झाली आहे. त्याच बरोबर त्यांनी फक्त महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि अब्दुल कलाम यांचीच नावे घेतल्याने बाकीच्यांचा हा देश नाही का? बाकीच्या महत्वपूर्ण नेत्यांचे या देशात काही योगदान नाही का? अशा पद्धतीचे सवाल असतात सोशल मीडियावर लोक उठवायला लागले आहेत. पी चिदंबरम आणि दिग्विजय सिंग या दोन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर मते व्यक्त करून देशभर वादाला नवे तोंड फोङले आहे.

    Whatever Gandhiji thought was ‘RamRajya’ is no longer the ‘RamRajya’ understood by many. What Pandit Ji told us about secularism is not the secularism understood by many

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!