वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सावरकरजी हे कोणी धार्मिक व्यक्ती नव्हते. त्यांच्या हिंदुत्वाचा हिंदू धर्माची आणि सनातनी परंपरेशी काही संबंध नव्हता, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी आज केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या “अयोध्या व्हर्ङिक्ट” या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते झाले त्यावेळी दिग्विजयसिंग बोलत होते.Whatever Gandhiji thought was ‘RamRajya’ is no longer the ‘RamRajya’ understood by many.
दिग्विजय सिंग यांनी हिंदुत्वासंदर्भात आपले विवेचन केले ते म्हणाले की, ज्यांनी हिंदुत्व शब्द देशाच्या राजकीय परिक्षेत्रात आणला ते सावरकरजी कोणी धार्मिक व्यक्ती नव्हते. त्यांच्या हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी आणि सनातनी परंपरेशी काहीही संबंध नाही. सावरकर तर त्यापुढे जाऊन म्हणत होते, गाईला माता कसे मानता येईल? गोमांस खाणे त्यांच्यासाठी निषिद्ध नव्हते. त्यांनी फक्त हिंदूंची ओळख निर्माण करण्यासाठी हिंदुत्व शब्द आणला, असा दावा दिग्विजय सिंग यांनी केला.
दिग्विजयसिंग पुढे म्हणाले, की प्रचार आणि प्रसार तंत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणी मुकाबला करू शकत नाही. अफवा फैलावणे आणि आपले तत्त्वज्ञान पुढे रेटत नेणे यामध्ये संघाचा कोणी हात धरू शकत नाही आणि आता तर सोशल मीडिया आणि इंटरनेट यांच्या युगात त्यांच्या हातात असे हत्यार गवसले आहे की ज्याची तोड काढणे कोणाच्याही हातात उरलेले नाही. संघ कायम अफवा पसरवूनच जिंकत असतो.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा गांधीवादी समाजवाद जेव्हा अपयशी ठरून भाजपचे फक्त दोन खासदार निवडून आले त्यावेळी संघाने पुन्हा हिंदुत्वाचा अजेंड्याकडे वळण्याचे ठरविले. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली राम रथयात्रा काढण्यात आली. अडवाणींची रथयात्रा जिथे-जिथे गेली तिथे तिथे त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये द्वेषभावना पसरवली आणि त्यातूनच भाजपचा राजकीय विजय साकार झालेला आपल्याला दिसतो, असा दावा देखील दिग्विजय सिंग यांनी केला.
महात्मा गांधी यांनी रामराज्याचे स्वप्न पाहिले होते. त्याचा सध्याचा राज्यकर्त्यांचा रामराज्यशी काहीही संबंध नाही. पंडितजींनी आपल्याला धर्मनिरपेक्षतेची दृष्टी दिली परंतु आजचे राज्यकर्ते त्यांच्या धर्मनिरपेक्षतेपासून श्रीमती दूर आहेत, असे विधान पी. चिदंबरम यांनी केले.
दिग्विजय सिंग आणि चिदंबरम या दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सावरकर – हिंदुत्व आणि पंडित नेहरू – धर्मनिरपेक्षता या विषयांवर आपापली मते व्यक्त करून देशात नव्या राजकीय वादाला तोंड फोडले आहे.
Whatever Gandhiji thought was ‘RamRajya’ is no longer the ‘RamRajya’ understood by many.
महत्त्वाच्या बातम्या
- टायटॅनिक स्टार लिओनार्दो डिकॅप्रियो आणि लॉरेन सांचेझच्या व्हायरल व्हिडिओवर जेफ बेझोफ यांची प्रतिक्रिया
- संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत आहे,एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी विचार करायला हवा – संजय राऊत
- मुंबई महापालिकेचे ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय; पण कोणाच्या राजकीय पथ्यावर??
- गिर्यारोहकांचे साहस, “वजीर” सुळका सर सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाचे यश
- महाराष्ट्रातली चिखलफेक नाना पटोले – संजय राऊतांना असह्य!!; मोठ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन