• Download App
    आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, असुद्दीन ओवेसी यांचा ममता बॅनर्जी यांना बोचरा सवाल|what should people like us do, Asuddin Owaisi's question to Mamata Banerjee

    आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, असुद्दीन ओवेसी यांचा ममता बॅनर्जी यांना बोचरा सवाल

    ऐन निवडणुकीत स्वत: ब्राम्हण असल्याचे सांगत फिरणा ऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एआयएमआयचे नेते असुद्दी ओवेसी यांनी बोचरा सवाल केला आहे. आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.what should people like us do, Asuddin Owaisi’s question to Mamata Banerjee


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: ऐन निवडणुकीत स्वत: ब्राम्हण असल्याचे सांगत फिरणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एआयएमआयचे नेते असुद्दी ओवेसी यांनी बोचरा सवाल केला आहे. आम्ही जानवंही घालत नाही, आमच्यासारख्यांनी काय करायचं, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे.

    एका प्रचारसभेत मी हिंदू ब्राह्मणाची मुलगी आहे. मला हिंदू धर्म शिकवायला जाऊ नका, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली होती. माझे गोत्र शांडिल्य असल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.



    यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. एक ट्विट करत ओवेसी यांनी म्हटले आहे की, आमच्यासारख्यांनी नेमकं काय करायचंआमच्यासारख्या लोकांना काय करायचं. आमचं गोत्र शांडिल्य नाही, जानवं घालत नाही,

    अमूक एका देवाचे भक्तही नाही, चालीसा पठण करत नाही की, त्या मार्गावर जात नाही. जिंकण्यासाठी हिंदू कार्ड वापरायला हवे, असे प्रत्येक पक्षाला वाटते. हे अनैतिक, अपमानजनक आणि अयशस्वी होणारे आहे.

    नंदीग्राम येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सवुेंदू अधिकाी यांनी ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ममता यांनी आपले हिंदूत्व सांगायला सुरूवात केली आहे. एका सभेत बोलताना त्या म्हणाल्या, एका मंदिरात पूजनासाठी गेले होते.

    तेव्हा मला माझे गोत्र विचारण्यात आले. मागे एकदा त्रिपुरेश्वरी मंदिरात मी माझे गोत्र मां, माटी आणि मनुष्य असल्याचे सांगितले होते. मात्र, आता मला विचारल्यावर मी सांगितले की, माझे वैयक्तिक गोत्र शांडिल्य आहे.

    what should people like us do, Asuddin Owaisi’s question to Mamata Banerjee

    Related posts

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा