विशेष प्रतिनिधी
दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमिटीचे अध्यक्ष प्रदेश प्रभारी आणि सरचिटणीस उपस्थित होते. त्याचप्रमाणे राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील आपली हजेरी लावली होती.
What did Sonia Gandhi say at the important meeting of the Congress party held under the chairmanship of Sonia Gandhi?
यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, भाजप आणि आरएसएस विरुद्ध लढण्यासाठी पक्षामध्ये शिस्त आणि ऐक्याची अत्यंत गरज आहे. त्याचप्रमाणे भाजप विरुद्ध वैचारिक मोहिमेवर लढा दिला पाहिजे. जर आपल्याला ही लढाई जिंकायची असेल तर लोकांसमोर त्यांचे खोटे रूप उघडे केले पाहिजे. असे देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पुढे त्या म्हणता, एआयसीसी मध्ये दररोज विविध समस्यांवर चर्चा केली जाते. महत्त्वपूर्ण विधाने आणि तपशीलवार विधाने जारी केले जातात. पण ब्लॉग आणि जिल्हास्तरावरील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचत नाही. राज्यस्तरीय नेत्यांमध्ये स्पष्टता आणि समन्वयाचा अभाव दिसत आहे.
पुढे त्या म्हणाल्या, बऱयाच राज्यांमध्ये बंडखोरी आणि अंतर्गत कलह सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षाला या सर्व गोष्टींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून सामूहिक आणि वैयक्तिक यश ज्या गोष्टींमध्ये आहे, त्या गोष्टींचा ध्यास घेतला पाहिजे. आणि राज्यातील नेत्यांमध्ये स्पष्टता आणि समन्वयतेचा अभाव दिसत आहे. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
What did Sonia Gandhi say at the important meeting of the Congress party held under the chairmanship of Sonia Gandhi?
महत्त्वाच्या बातम्या
- लोकल गुरुवारपासून सुसाट धावणार, १०० टक्के फेऱ्या सुरु होणार; प्रवाशांना मोठा दिलासा
- गृहराज्यमंत्री देसाई यांचा पोलिस ठाण्यामध्ये प्रवेश पोलिसांची झाडाझडती, आरोपी शोधण्याचे आदेश
- ‘स्पेशल २६’ लवकरच रिलीज करतोय – नवाब मलिक
- टाटा कंपनीचे १८० शहरात एक हजार चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क; महामार्गावर सुद्धा योजना
- माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यन खानची ड्रग्जची केस मुंबई हायकोर्टात लढणार