• Download App
    प. बंगालमधील नामवंतांचे शेख हसीना यांना पत्र , मंदिरांवरील हल्लेखोरांना शासन करा West Bengal lariats wrote letter to Bangala PM

    प. बंगालमधील नामवंतांचे शेख हसीना यांना पत्र , मंदिरांवरील हल्लेखोरांना शासन करा

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – बांगलादेशमधील दुर्गापूजा देखावे तसेच मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांमुळे बंगालमधील विविध क्षेत्रांतील दिग्गज दुखावले आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना उद्देशून खुले पत्र जारी करण्यात आले आहे. हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याद्वारे करण्यात आली. West Bengal lariats wrote letter to Bangala PM

    या पत्रावर साठहून अधिक दिग्गजांनी सह्या केल्या आहेत. विविध ठिकाणी दुर्गापूजा देखाव्यांवर हल्ले झाल्याने आणि अनुचित घटना घडल्यामुळे बांगलादेशमधील हिंदू धर्मीयांना आपला सर्वांत मोठा सण सुरळीतपणे साजरा करता आला नाही याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला.

    बांगलादेश सरकार आणि पोलिसांनी तातडीने हालचाली केल्यामुळे आणखी मोठे संकट नक्कीच टाळले गेले, पण १९७१च्या मुक्तीसंग्रामामुळे प्रज्ज्वलित झालेल्या मुक्त तसेच धर्मभेदरहित वंगबंधुत्वाच्या विचारसरणीला विरोध करण्याचे प्रयत्न व्यथित करणारे आहेत. त्यामुळे मानवतेवर श्रद्धा ठेवणारे जागरूक लोक दुखावले गेले आहेत, असे नमूद करण्यात आले.

    अल्पसंख्याक समुदायाला आपल्या जीव तसेच मालमत्तेचे रक्षण तसेच स्वतःच्या धर्माचे आचरण करणे शक्य व्हावे याची जबाबदारी बहुसंख्याक समुदायावर असते, असे आग्रही मत पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.

    West Bengal lariats wrote letter to Bangala PM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार