वृत्तसंस्था
कोलकाता – राजधानी नवी दिल्लीत केंद्रीय वरिष्ठ स्तरावर व्यापक विचारविनिमय करून आल्यानंतर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड कोलकात्यात परतले. पण ते लगेच उद्यापासून कोलकाता सोडून उत्तर बंगालच्या आठवडाभराच्या दौऱ्यावर निघणार आहे. West Bengal Governor Jagdeep Dhankhar will go on a week long visit to North Bengal from tomorrow
पश्चिम बंगालच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. राज्यात निवडणूकी दरम्यान झालेला हिंसाचार आणि निवडणूक निकालानंतर झालेला हिंसाचार अभूतपूर्व ठरला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या हिंसाराकडे ढुंकूनही बघितलेले नाही. उलट हा राजकीय हिंसाचार भाजपचे षडयंत्र असल्याचा आरोप त्या सातत्याने करीत आल्या आहेत. राज्यात निवडणूक निकालानंतर ४४ हिंदूंची हत्या झाल्याचा आकडा भाजपने राज्यपालांना दिलेल्या निवेदनात अधिकृतपणे नोंदविण्यात आला आहे.
स्वतः राज्यपालांनी देखील निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालच्या काही संवेदनशील जिल्ह्यांचा दौरा केला होता. पण तो दोन – तीन दिवसांचा दौरा होता. त्यानंतर राज्यपालांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. अमित शहा यांच्याशी त्यांची सलग दोन दिवस प्रत्यक्ष भेटून चर्चा झाली आहे.
या व्यापक विचार विनिमयानंतर राज्यपाल जगदीप धनकड काल कोलकात्यात परतले. आज सायंकाळी त्यांच्या उत्तर बंगालच्या आठवडाभराच्या दौऱ्याची घोषणा राजभवनातून करण्यात आली.
West Bengal Governor Jagdeep Dhankhar will go on a week long visit to North Bengal from tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Cases : ८१ दिवसांनंतर २४ तासांत ६० हजारांहून कमी रुग्णांची नोंद, १५७६ जणांचा मृत्यू
- रावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या 5 पोलिसांचं निलंबन मागे, खोतकरांनी गृहमंत्र्यांकडे केली होती मागणी
- सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरू करणार
- संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोर्तुगालचे माजी पंतप्रधान गुटेरेस यांची फेरनिवड
- इराणच्या अध्यक्षपधी अमेरिकाविरोधी कट्टरतावादी रईसी यांची निवड