• Download App
    मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलल्या; ममता बॅनर्जी गोव्यात, अरविंद केजरीवाल पंजाबात!! |West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee reaches Goa; visual from Goa airport in Dabolim

    मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षा फुलल्या; ममता बॅनर्जी गोव्यात, अरविंद केजरीवाल पंजाबात!!

    वृत्तसंस्था

    पणजी/ मनसा : गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर राहून नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर झेप घेतल्यानंतर बाकीच्या मुख्यमंत्र्यांच्याही महत्त्वाकांक्षा फुलल्या आहेत. या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांची पावले आपापल्या राज्य बाहेर पडताना दिसत आहेत.West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee reaches Goa; visual from Goa airport in Dabolim

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्ली, आसाम, त्रिपुराचा दौरा आटोपून गोव्यामध्ये येऊन धडकल्या आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आयोध्येच्या रामलल्लांचे दर्शन घेऊन पंजाबात येऊन पोहोचले आहेत.



    ममता बॅनर्जी गोव्यात पुढचे चार दिवस मुक्काम ठोकणार आहेत. तेथे त्यांचे विविध राजकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, तर अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाबमध्ये मनसा येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित केले.

    देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाल्यानंतर देखील शेतकरी आत्महत्या करत असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे, असे उद्गार त्यांनी काढले आहेत. आम आदमी पक्ष देशात असे वातावरण निर्माण करू इच्छितो की एकही शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले.

    नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच भाजपने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची घोषणा केली होती. त्यानंतर दीड वर्ष मोदींचे प्रतिमा वर्धन करण्यात आले. याचा लाभ लोकप्रियतेच्या रूपाने भाजप आणि मोदींना मिळाला.

    एक प्रकारे त्यांच्याच पावलावर पाऊले टाकून ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही मुख्यमंत्री आपापल्या राज्याबाहेर म्हणजे पश्चिम बंगाल आणि दिल्लीबाहेर जाऊन आपापल्या राजकीय पक्षांचे भवितव्य अजमावत आहेत. यासाठी त्यांनी काँग्रेससह इतर पक्ष फोडण्याचा सपाटा लावला आहे.

    अर्थात नरेंद्र मोदी यांच्यामागे भाजप सारखा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय दर्जाचा पक्ष आहे. त्या तुलनेत ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांची आम आदमी हे दोन्ही पक्ष छोटे आहेत. त्यांचा राजकीय दर्जादेखील राष्ट्रीय पातळीवरचा अद्याप तयार झालेला नाही.

    परंतु ममता आणि केजरीवाल या दोन्ही नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा मात्र राष्ट्रीय पातळीवर तसेच नेतृत्व करण्याच्या राहिल्या आहेत आणि आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या महत्त्वाकांक्षा अधिक फुलताना दिसत आहेत. म्हणूनच त्यांनी या दोन्ही नेत्यांनी आपापली राज्य ओलांडून इतर राज्यांमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

    West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee reaches Goa; visual from Goa airport in Dabolim

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!