• Download App
    भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची राजकारणातून संन्यासाची घोषणा, म्हणाले - कोणत्याही पक्षात जाणार नाही! । West Bengal BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics, Wrote A Post On Facebook

    भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांची राजकारणातून संन्यासाची घोषणा, म्हणाले – कोणत्याही पक्षात जाणार नाही!

    BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर याची घोषणा केली. ते म्हणाले की, मी राजकारणात सामाजिक कार्य करण्यासाठी आलो होते, पण आता मला वाटते की, हे काम राजकारणापासून दूर राहूनही करता येते.  West Bengal BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics, Wrote A Post On Facebook


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर याची घोषणा केली. ते म्हणाले की, मी राजकारणात सामाजिक कार्य करण्यासाठी आलो होते, पण आता मला वाटते की, हे काम राजकारणापासून दूर राहूनही करता येते. राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले, “अलविदा. मी कोणत्याही राजकीय पक्षाकडे जात नाही. टीएमसी, काँग्रेस, माकपने मला कोणीही बोलावले नाही. मी कुठेही जात नाहीये. सामाजिक कार्य करण्यासाठी तुम्हाला राजकारणात येण्याची गरज नाही. राजकारणापासून दूर राहूनही मी माझा हेतू पूर्ण करू शकतो.”

    बाबुल सुप्रियो यांनी असेही म्हटले आहे की, ते एका महिन्याच्या आत सरकारी निवासस्थान सोडतील आणि खासदारकीचाही राजीनामा देतील. गेल्या काही दिवसांपासून बाबुल सुप्रियो यांच्या भाजपमधील कमी पडणाऱ्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. असा अंदाजही लावला जात होता की, ते काही मोठा निर्णय घेऊ शकतात.

    West Bengal BJP MP Babul Supriyo Announces Retirement From Politics, Wrote A Post On Facebook

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Hyderabad : हैदराबादमधील रस्त्याचे नाव ट्रम्प एव्हेन्यू ठेवण्याचा प्रस्ताव; गुगल-मायक्रोसॉफ्टची नावेही प्रस्तावित, भाजपने म्हटले-आधी शहराचे नाव भाग्यनगर करा

    विरोधी पक्षनेते पदांवरची नावे बदलून भाजपची महाविकास आघाडीत पाचर!!

    Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंचे 13 आमदार माझ्या संपर्कात:मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा; आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे सूतोवाच