वृत्तसंस्था
कोलकाता : नंदीग्राममध्ये सव्वा तासाच्या मतमोजणीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राममध्ये पिछाडीवर चालल्या आहेत. एकेकाळचे त्यांचे उजवे हात सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. त्यांच्यात काट्याची टक्कर सुरू आहे.West bengal assembly elections 2021 results updates
तृणमूळ काँग्रेस ९९ तर भाजप ९४ जागांवर आघाडीवर असल्याने बंगालची लढाई अत्यंत चुरशीच्या अवस्थेत पोहोचली आहे. ममता बॅनर्जी स्वतःच हरल्या तर त्या काय करतील , तसेच त्यांचे रणनीतीकार प्रशांत किशोर आपले निवडणूक रणनीतीकाराचे काम सोडून देतील का,याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पहिल्या सव्वा तासात निवडणूक कोणाच्याच बाजूने एकतर्फी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण आकडे सारखे बदलत असले तरी त्यांच्यातले अंतर ५ जागांपेक्षा अधिक नाही.
त्यामुळे बंगालमध्ये त्रिशंकू विधानसभेची चर्चाही जोर धरताना दिसत आहे. या सगळ्यात काँग्रेस आणि डावे पक्ष तसेच फुर्फुरा शरीफ वाऱ्यावर उडून गेलेले दिसत आहेत. डाव्या पक्षांची आघाडी फक्त २ जागांवर आघाडीवर दिसत आहे.
West bengal assembly elections 2021 results updates
महत्वाच्या बातम्या
- Gas Cylinder Price : व्यावसायिक गॅस ४५ रूपयांनी स्वस्त ; घरगुती गॅस मात्र महागच
- धक्कादायक : ‘खरं बोललो, तर शीर कापतील’; सीरम प्रमुख अदर पुनावालांना बड्या नेत्यांकडून धमक्या; कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे बोट?
- Assembly Election Results 2021 : प. बंगालसहित पाचही राज्यांचे निवडणूक निकाल, उद्या सकाळी आठपासून येथे पाहा अचूक रिझल्ट्स
- Tamil nadu Assembly Election 2021 Result : द्रमुक जिंकणार की अद्रमुक ? तमिळनाडूत उत्सुकता शिगेला
- कोरोनामुळे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय डबघाईला ; लॉकडाऊनमुळे अर्थचक्राचे चाक रुतले