विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपण काळा कोट परिधान केला आहे, याचा अर्थ असा नाही की, आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मूल्यवान आहे, असे म्हणत कोरोना वा अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्या ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या वकिलांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये भरपाई देण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.Wearing a black coat means your life is not more valuable than other people’s, lawyer’s family’s Rs 50 lakh compensation petition rejected
वकिलांचे जीवन हे अन्य लोकांपेक्षा अधिक मूल्यवान आहे, असे म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. विक्रम नाथ आणि न्या. बी. व्ही. नागरत्ना यांच्या पीठाने स्पष्ट केले की, या याचिकेला प्रासंगिक आधार नाही. देशात कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
याचिकाकर्ते वकील प्रदीप कुमार यादव यांना न्यायालयाने विचारले की, समाजातील अन्य लोकांना महत्त्व नाही का. आपण काळा कोट परिधान केला आहे, याचा अर्थ असा नाही की, आपले जीवन अन्य लोकांपेक्षा अधिक मूल्यवान आहे.
यादव यांनी न्यायालयात सांगितले की, ही याचिका परत घेऊ आणि ठोस आधारावर पुन्हा याचिका दाखल करू. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि याचिकाकर्त्यास दहा हजार रुपये दंड ठोठावला.
Wearing a black coat means your life is not more valuable than other people’s, lawyer’s family’s Rs 50 lakh compensation petition rejected
महत्त्वाच्या बातम्या
- कोणतीही भाषा कमी दर्जाची नाही, घरात मुलांशी मातृभाषेतच बोलण्याचे अमित शहा यांचे आवाहन
- मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर गॅसटँकरला कंटेनरची जोरदार धडक; एक्सपर्टमुळे गॅस लिकेज थांबले
- पुणे- पिंपरी चिंचवडमधील ‘मोफत’ शिवभोजन थाळी बंद; ग्राहकांना आता मोजावे लागणार १० रूपये
- भाजपाने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले; उत्तर भारतात चौघांचा तर दक्षिण भारतातील एकाचा समावेश