विशेष प्रतिनिधी
सीतापूर : कोरोनाची लस परदेशात चढ्या किमतीत दिली जात आहे. मात्र, भाजपा सरकारसाठी तिजोरी नव्हे तर देशवासियांचा जीव अनमोल आहे. तिजोरी रिकामी करू, पण लस घरोघरी पोहोचविणार. हे काम आम्ही केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.We will empty the coffers but we will deliver the vaccine from door to door, says Prime Minister Narendra Modi.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीतापूर येथील प्रचारसभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात परिस्थिती अशी होती की, तणावाशिवाय आणि कर्फ्यूशिवाय एखादा सण झाला तर लोक सुटकेचा नि:श्वास घेत होते.
आता उत्तर प्रदेशातील जनतेला गुन्हेगार आणि दंगलखोरांपासून मुक्त करण्याचे काम योगी सरकारने केले आह. ज्यांनी कायद्याचे राज्य आणले त्यांना आम्ही आणले असे संपूर्ण उत्तर प्रदेश सांगत आहे.कोरोनाच्या काळात गरिबांना मोफत लस देण्यावर आमच्या सरकारने पूर्ण लक्ष दिले.
यापूर्वीच्या सरकारमध्ये एवढी मोठी मोहीम राबवून गरिबांना मोफत लस दिली जात नव्हती. स्वातंत्र्यानंतर हे पहिल्यांदाच घडत आहे. पूर्वीच्या सरकारांचा लसीकरण कार्यक्रम आमच्या गावापर्यंत, आदिवासी भागातही पोहोचू शकला नाही. कार्यक्रम वषार्नुवर्षे सुरू असायचे आणि लसीचा एकही डोस लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.
पंतप्रधान म्हणाले, गरीब माता, बहिणी आणि मुलींना दु:खापासून, उघड्यावर शौचाच्या अपमानापासून मुक्ती हवी आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर माझी गरीब आई अंधाराची वाट पाहत असे. ही माझ्या गरीब आईची व्यथा, गरीब कुटुंबाची व्यथा, गरिबीतून आलेला तिचा मुलगाच जाणू शकतो. भाजपा सरकारने उत्तर प्रदेशात 2 कोटींहून अधिक शौचालये बांधली.
We will empty the coffers but we will deliver the vaccine from door to door, says Prime Minister Narendra Modi.
महत्त्वाच्या बातम्या
- सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम हरे यांचे निधन
- NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडल्यावर आरोपी म्हणाला – ‘शरीरात चिप लावून कुणीतरी कंट्रोल करतंय!’
- बिग बीं’ चा सुरक्षा हवालदार जितेंद्र शिंदे निलंबित दीड कोटी उत्पन्न उघड झाल्यानंतर खळबळ
- गँगस्टर गजानन मारणेच्या पत्नीचा पुण्यात राष्ट्रवादीत प्रवेश; शरद पवार, सुप्रियाताईंच्या विचारांनी प्रभावित होऊन घेतला निर्णय!!