• Download App
    ओवेसींवर हल्ला झाला की घडविला? कथित देशभक्त सचिन हिंदू एमआयएमआयच्या उमेदवाराचा मित्र|Was Owesi attacked or not? Alleged patriotic friend of Hindu MIMI candidate

    ओवेसींवर हल्ला झाला की घडविला? कथित देशभक्त सचिन हिंदू एमआयएमआयच्या उमेदवाराचा मित्र

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : एमआयएमआयचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्ला झाला की घडविला गेला असा संशय निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे ज्या देशभक्त सचिन हिंदूने हा एमआयएमआयच्या उमेदवाराचा मित्र असल्याचे उघड झशला आहे.Was Owesi attacked or not? Alleged patriotic friend of Hindu MIMI candidate

    पोलिसांच्या एफआयआरनुसार, सचिनचे फेसबुक पेज देशभक्त सचिन हिंदूच्या नावाने असून, ओवेसी यांच्या हिंदुविरोधी भाषणांमुळेच त्याला ओवेसीची हत्या करायची होती. त्यामुळे सचिन ओवेसींच्या धौलानामधून निवडणूक लढवणा?्या आरिफच्या सतत संपर्कात होता. कहाणीनुसार ओवेसींच्या पाटीर्चे आरिफ आणि देशभक्त सचिन हिंदू यांच्या मैत्री होती.



    ओवेसींच्या ट्विटमध्ये एक पिस्तूल घटनास्थळी पडलेली पाहायला मिळाली होती. तर पोलिसांनी रेकॉर्डमध्ये लिहिले की, दोन्ही हल्लेखोरांकडून पिस्तूल जप्त केली आहे. अशा वेळी आता हे प्रकरण कोर्टात येईल तर या संशयाचा फायदा हल्लेखोरांना मिळणार हे नक्की आहे. सध्या या संशयाचा फायदा राजकीय पक्ष उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या समजदार जनतेला सर्व काही कळते.

    शुभमने पहिली गोळी, सचिनने नंतर दुसरी गोळी झाडली. या घटनेचे दोन फुटेज समोर आले आहेत. दोघांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर बूथच्या पुढे होते आणि ओवेसींची गाडी मागे. पहिले, शुभम लाल रंगाच्या हुडीमध्ये गोळी झाडताना दिसतो, जो नंतर एका पांढऱ्या कारला धडकताना दिसतो. ही गाडी ओवेसींची नाही. त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या हुडीमध्ये सचिनने दुसऱ्या वाहनावर गोळ्या झाडल्या. ती ओवेसींची गाडी असू शकते. त्यानंतर दोघे पळून जातात.

    बॅरियरपूर्वी फायरिंग झाली, स्फोट झाल्यानंतर काय झाले असे विचारल्यावर यामीन म्हणाला- भाई, हल्ला झाला आहे. पाहिले तर रेड हुडीवाला गोळ्या झाडत होता. यामीनने गाडीला धडक दिली आणि आमची गाडी पुढे वळवली. पांढºया रंगाच्या हुडीतल्या माणसाने आमच्या मागून येणाऱ्या फॉर्च्युनरवर गोळीबार केला. ओवेसी यांनी रात्री 9 वाजता हल्ल्याचे ट्विट केले, रात्री 9.49 वाजता आणखी एका ट्विटमध्ये टोल बूथवर घटनास्थळी एक पिस्तूल टाकण्यात आल्याचे सांगितले. ज्यावर कलावा बांधलेला नव्हता.

    ओवेसी म्हणतात की, हल्ल्याची माहिती त्यांना स्फोटांचा आवाज आणि यामीनने सांगितल्यानंतर झाली. म्हणजेच त्यांनी सचिनला गोळी झाडताना पाहिले नव्हते आणि ते खाली वाकले देखील नव्हते, मात्र पोलिसांनी सांगितलेल्या कथेत त्यांनी सचिनला गोळी झाडताना पाहिले होते.

    घटनेच्या रात्री 9.49 वाजता ओवेसी यांनी घटनास्थळ दाखवत एक ट्विट केले, ज्यामध्ये घटनास्थळी एक पिस्तूल पडलेले दिसत आहे, मात्र पोलिसांनी सचिनला रात्री 11 वाजता आणि शुभमला पहाटे 4 वाजता अटक केली आणि दोघांकडून पिस्तूल जप्त केल्याचे सांगितले. त्यामुळे घटनास्थळी दिसणारे पिस्तूल पोलिसांच्या नोंदीतून कसे गायब झाले.

    Was Owesi attacked or not? Alleged patriotic friend of Hindu MIMI candidate

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!