• Download App
    शेतकरी कंटाळले अन् संघटनांचा आंदोलनाचा इशारा, उद्धव ठाकरे,ममतांसह विरोधी पक्षांचेही पाठिंब्यांचे राजकारण, २६ मे रोजी देशभर निदर्शने,Warning of agitation by farmers unions, politics of support of opposition parties too

    शेतकरी कंटाळले अन् संघटनांचा आंदोलनाचा इशारा, उद्धव ठाकरे,ममतांसह विरोधी पक्षांचेही पाठिंब्यांचे राजकारण, २६ मे रोजी देशभर निदर्शने,

    दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी कंटाळले आहे. कोरोना पसरत असल्याच्या धास्तीने आंदोलन मागे घेण्याची मागणी होत आहे. मात्र, संयुक्त किसान मोर्चा आंदोलनावर ठाम असून त्यामध्ये प्राण फुंकण्यासाठी २६ मे रोजी देशभर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. सरकारविरुध्द राजकारण साधण्याची संधी म्हणून १३ विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.Warning of agitation by farmers unions, politics of support of opposition parties too


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी कंटाळले आहे. कोरोना पसरत असल्याच्या धास्तीने आंदोलन मागे घेण्याची मागणी होत आहे.

    मात्र, संयुक्त किसान मोर्चा आंदोलनावर ठाम असून त्यामध्ये प्राण फुंकण्यासाठी २६ मे रोजी देशभर निदर्शने करण्याची घोषणा केली आहे. सरकारविरुध्द राजकारण साधण्याची संधी म्हणून १३ विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.



    शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत आहेत. यामुळे २६ मे रोजी संयुक्त किसान मोर्चाने देशभर निदर्शने करण्याचे ठरविले आहे. कॉँग्रेससह १३ विरोधी पक्षांनी संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

    केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या सीमेवर सहा महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आंदोलनातील दोन शेतकऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने आंदोलकांमध्ये धास्ती पसरली आहे.

    अनेक शेतकरी आपल्या गावात परतू लागले आहेत. त्यामुळे या आंदोलनात प्राण फुंकण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर निदर्शनांचा इशारा दिला आहे. कॉँग्रेसतर्फे सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार), एचडी देवेगौडा (जनता दल धर्मनिरपेक्ष),

    ममता बॅनर्जी (तृणमूल कॉँग्रेस), उध्दव ठाकरे (शिवसेना), एम. के. स्टॅलिन (डीएमके), हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा), अखिलेश यादव (समाजवादी पक्ष), तेजस्वी यादव (राष्ट्रीय जनता दल), डी. राजा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), सीताराम येचुरी (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), अरविंद केजरीवाल (आप), फारुख अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स) या नेत्यांनी संयुक्त किसान मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

    संयुक्त किसान मोर्चाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्याची मागणी केलीआहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे प्रमुख या नात्याने पुन्हा चर्चा सुरू करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

    चर्चेत आमचे प्रश्न सुटले तर आम्ही आपापल्या घरी जाऊ. या पत्रात म्हटले आहे की २५ मे पर्यंत सरकारने काही उत्तर दिले नाही तर २६ मे रोजी राष्ट्रीय विरोध दिवस केला जाईल पुढच्या टप्यात संघर्ष आणखी तीव्र केला जाईल.

    Warning of agitation by farmers unions, politics of support of opposition parties too

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य