• Download App
    आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्येही व्हिस्टाडोम कोच, 15 ऑगस्टपासून सुरू होणार फेऱ्या, प्रवाशांना रेल्वेडब्यातूनच मिळेल निसर्गाचा आनंद|Vistadom coaches on Mumbai-Pune Deccan Queen Express now, rounds starting from August 15

    आता मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्येही व्हिस्टाडोम कोच, 15 ऑगस्टपासून सुरू होणार फेऱ्या, प्रवाशांना रेल्वेडब्यातूनच मिळेल निसर्गाचा आनंद

    वृत्तसंस्था

    दिल्ली : भारतीय रेल्वेने डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 02123/02124) मध्ये दि. १५ ऑगस्टपासून एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर जोडण्यात आलेला हा दुसरा व्हिस्टाडोम कोच आहे. याच मार्गावर पहिल्यांदा (ट्रेन क्र. 01007/01008) मुंबई -पुणे डेक्कन एक्स्प्रेस विशेष ट्रेनमध्ये दि. २६ जूनपासून व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आलेला आहे.Vistadom coaches on Mumbai-Pune Deccan Queen Express now, rounds starting from August 15

    या मार्गावरील प्रवाशांची मागणी लक्षात घेता आणि डेक्कन एक्स्प्रेसमध्ये लावण्यात आलेल्या पहिल्या व्हिस्टाडोम कोचला प्रवाशांचा मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, आता डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्सप्रेस विशेष ट्रेनमध्येही एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



     

    कसा असेल ट्रेनचा प्रवास

    • ट्रेन क्रमांक 02124 पुण्याहून ०७.१५ वाजता सुटेल आणि १०.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
    • ट्रेन क्रमांक 02123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून १७.१० वाजता सुटेल आणि २०.२५ वाजता पुण्याला पोहोचेल.

    असे असतील ट्रेनमध्ये डबे

    एक व्हिस्टाडोम कोच, ४ वातानुकूलित चेअर कार, ९ सामान्य द्वितीय आसन श्रेणी, २ द्वितीय आसन श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ पॅन्ट्री कार.

    असे करता येईल आरक्षण

    नव्याने जोडललेल्या व्हिस्टाडोम कोचमध्ये विशेष ट्रेन क्रमांक 02123/02124 चे बुकिंग दि. ८ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवास आणि पोहोचण्याच्या स्थानादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे व एसओपीचे पालन करावे लागेल.

    Vistadom coaches on Mumbai-Pune Deccan Queen Express now, rounds starting from August 15

    Related posts

    Bansuri Swaraj : बांसुरी स्वराज यांनी गांधी कुटुंबाला एका खास ‘बॅग’द्वारे केले लक्ष्य

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!