विशेष प्रतिनिधी
चेन्नई : कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या एका महिला हवाई दल अधिकाºयाने तिच्या सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणातील पीडित महिलेने कौमार्य चाचणी (टू फिंगर टेस्ट) घेण्यात आल्याचा आरोपही पोलीस तक्रारीत केला आहे.Virginity test of female Air Force officer who reported rape, incident in Chennai
कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तसेच बलात्कारानंतर तिला कसे धमकावले गेले आणि ब्लॅकमेल केले गेले याबद्दल पीडितेने पोलिसांना जबाब दिला आहे.२६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणासाठी रेडफील्डमधील एअर फोर्स कॉलेजमध्ये असलेल्या महिला आयएएफ अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून फ्लाइट लेफ्टनंट अमितेश हरमुख यांना महिला पोलिसांनी कोईम्बतूरमध्ये अटक केली होती.
दरम्यान, आरोपीविरोधातील पीडितेच्या तक्रार हाताळणीमध्ये तिची दिशाभूल करण्यात आली होती, असा आरोपही तिने केला आहे. ऑगस्ट महिन्यात देशभरातून एकूण ३० हवाई दल अधिकारी कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आले होते. पीडित २९ वर्षीय महिला अधिकारी १० सप्टेंबरला बास्केटबॉल खेळताना जखमी झाली होती.
तिचा पाय जखमी झाला होता. यामुळे तिने पेनकिलर घेतलं होतं. त्यानंतर तिने मित्रांसोबत दोन ग्लास दारू प्यायली होती. त्यापैकी एक ग्लास हा आरोपीने दिला होता. नंतर तिला मळमळ होऊ लागली आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणींनी तिला खोलीत नेऊन तिला झोपवले.
दरम्यान, तिची शुद्ध हरपण्यापूर्वी आरोपीने तिच्या खोलीत प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती हालचाल करू शकत नव्हती, तरी तिने आरोपीला तिथून जाण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तिच्या खोलीत अमितेश उपस्थित असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने तिला दिली आणि विचारले की तिने त्याला आत का येऊ दिलं? त्यानंतर अमितेशने अत्याचार केल्याची कबुली देत माफी मागितली आणि कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचं सांगितले.
पीडितेच्या मित्रांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये अमितेशने आपल्या कृत्याची कबुली दिली होती, असे महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यानंतर पीडितेने याबद्दल काही अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तिला तक्रार दाखल न करण्याचं सांगत आरोपींवरील आरोप मागे घेण्याचा विचार करण्यास सांगितले.
जेव्हा तिने तक्रार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टरांनी आरोपीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितले आणि सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली कौमार्य चाचणी देखील घेतली, असा आरोप पीडितेनं केला आहे.
सतत चुकीच्या मार्गदर्शनामुळे आणि अप्रत्यक्ष धमक्यांमुळे मला अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्याच्या माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागला आणि त्यामुळे उशीर झाला. पण शेवटी १९ सप्टेंबरच्या रात्री अधिकाऱ्यांवर विश्वास राहिला नसल्याने ऑनलाइन एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे या पीडितीने म्हटले आहे.
Virginity test of female Air Force officer who reported rape, incident in Chennai
महत्त्वाच्या बातम्या
- भंगारातून रेल्वेने केली 227.71 कोटी रुपयांची कमाई
- शशी थरूर, मनीष तिवारी यांनीही कपिल सिब्बल यांची बाजू उचलून धरली!!
- नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…; सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 38 रूग्णवाहिकांची केली मागणी
- पश्चिम बंगालची पोटनिवडणूक : ममता बॅनर्जी जिंकल्या तरच मुख्यमंत्रीपदी राहणार, भवितव्य मतदान यंत्रात बंद, रविवारी निकाल जाहीर; अख्ख्या देशाचे लक्ष
- ऑक्टोबर महिन्यात दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण, सरकार २८ कोटी लसी विकत घेणार