• Download App
    नवज्योत सिंग सिध्दू कुठूनही लढणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही, कॅ. अमरिंदर सिंग यांचा इशारा|No matter where Navjot Singh Sidhu fights, I will not let him win, Ca. Amarinder Singh's warning

    नवज्योत सिंग सिध्दू कुठूनही लढणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही, कॅ. अमरिंदर सिंग यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नवज्योतसिंग सिद्धू पंजाबसाठी योग्य व्यक्ती नाही. जर तो निवडणूक लढवणार असेल, कुठूनही लढवणार असला तरी मी त्याला जिंकू देणार नाही, असा इशारा पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दिला आहे.No matter where Navjot Singh Sidhu fights, I will not let him win, Ca. Amarinder Singh’s warning

    पंजाबाचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग व पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादावरून सुरू झालेल्या या घडामोडी अद्यापही सुरूच आहेत. आता या दोघांनी देखील राजीनामे दिलेले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली.



    मात्र, आपण भाजपात सामील होणार नसल्याचं अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची देखील भेट घेतली आहे. आम्ही सुरक्षेसंदभार्तील मुद्द्य्यांवर चर्चा केली. जी इथे सांगता येणार नाही, असे अमरिंदरसिंग यांनी सांतिले.

    नवज्योत सिंग सिध्दू यांच्यावर निशाणा साधताना कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, ते आता काँग्रेससोबत राहणार नाहीत आणि भाजपातही प्रवेश करणार नाही. कॉँग्रेस पक्ष बहुमत गमावत असेल, तर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा. चन्नी यांचं काम सरकार चालवण आहे. सिद्धू यांचं काम पक्ष चालवण आहे. चन्नी यांच्या कामात सिद्धू यांनी हस्तक्षेप करायला नको.

    आपल्या क्षमतांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा विश्वास नसल्याने आपल्याला अपमानित वाटत आहे, असं कारण देत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने अनुसुचित जातीचे उमेदवार चरणजीत सिंग चन्नी यांना पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून निवडलं. त्यानंतर काही दिवसांतच नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे.

    No matter where Navjot Singh Sidhu fights, I will not let him win, Ca. Amarinder Singh’s warning

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कुकी दहशतवद्यांना मणिपूरमध्ये CRPF कॅम्पला केले लक्ष्य ; बॉम्ब फेकले, दोन जवान शहीद

    काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, अरविंदर सिंग लवली यांचा दिल्ली अध्यक्षपदाचा राजीनामा

    ओडिशात बीजेडीला मोठा धक्का, अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल!