विशेष प्रतिनिधी
जोहान्सबर्ग : जोहान्सबर्ग कसोटीत भारताला मोठा धक्का बसला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार विराट कोहली हा या सामन्यात खेळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता केएल राहुल हा संघाचं नेतृत्व करत आहे. Virat Kohli out of second Test
केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, ‘विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल अशी आशा आहे.’
विराट कोहलीसाठी हा सामना खास होता, कारण हा त्याचा 99 वा कसोटी सामना होता. या सामन्यात विराट कोहली खेळला असता तर मालिकेतील शेवटचा सामना हा 100वा कसोटी सामना ठरला असता. पण आता तसे होणार नाही, कारण तिसरी कसोटी हा त्याचा 99वा सामना असेल आणि 100 व्या कसोटी सामन्यासाठी आता त्याला पुढील दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.
प्लेइंग-11 बद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या ऐवजी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. हनुमा विहारी दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा सामना खेळला होता.
Virat Kohli out of second Test
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाब काँग्रेस मध्ये गुस्सा पुन्हा फुटला; उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग म्हणाले, गृह मंत्रालय नवज्योत सिद्धूंच्या पायावर ठेवीन!!
- Lakhimpur Violence : लखीमपूर प्रकरणात एसआयटीचे ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल, गृह राज्यमंत्र्यांच्या मुलगा मुख्य आरोपी
- मुंबईहून बंगळुरूला जाणाऱ्या बस सीमेवरून माघारी महाराष्ट्रात धाडल्या ; शेकडो प्रवाशांची कुचंबणा
- शस्त्रक्रियेला जाण्याच्या ऐनआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केला होता फोन, काय झालं बोलणं? अनिल थत्तेंनी केला हा दावा!