• Download App
    Ind Vs Sa: Virat Out ! विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा ....। Virat Kohli out of second Test

    Ind Vs Sa: Virat Out ! विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर ‘हा’ खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा ….

    विशेष प्रतिनिधी

    जोहान्सबर्ग : जोहान्सबर्ग कसोटीत भारताला मोठा धक्का बसला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार विराट कोहली हा या सामन्यात खेळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता केएल राहुल हा संघाचं नेतृत्व करत आहे. Virat Kohli out of second Test

    केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, ‘विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीचे स्नायू दुखावले आहेत. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पुढील कसोटी सामन्यापर्यंत विराट कोहली फिट होईल अशी आशा आहे.’

    विराट कोहलीसाठी हा सामना खास होता, कारण हा त्याचा 99 वा कसोटी सामना होता. या सामन्यात विराट कोहली खेळला असता तर मालिकेतील शेवटचा सामना हा 100वा कसोटी सामना ठरला असता. पण आता तसे होणार नाही, कारण तिसरी कसोटी हा त्याचा 99वा सामना असेल आणि 100 व्या कसोटी सामन्यासाठी आता त्याला पुढील दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.

    प्लेइंग-11 बद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीच्या ऐवजी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. हनुमा विहारी दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा सामना खेळला होता.

    Virat Kohli out of second Test

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    NCP(SP) : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी नेहरू + इंदिरा गांधींची स्तुती; काँग्रेसला डोळा मारी!!

    Longest serving PM : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे PMO मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन; PMO मधला दुर्मिळ फोटो समोर!!

    Meenakshi Natrajan : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का! मीनाक्षी नटराजन यांचे राज्यसभा नामांकन रद्द; आमदारांना घेऊन जाणारे विमानही धावपट्टीवरून परतले