• Download App
    T20 WC, Ind Vs Pak: 'रोहितला काढून टाकू का?', पाककडून पराभवानंतर पत्रकाराच्या प्रश्नावर कोहली भडकला । Virat kohli got angry in press conference after loss against pakistan in t20 world cup 2021

    T20 WC, Ind Vs Pak: ‘रोहितला काढून टाकू का?’, पाककडून पराभवानंतर पत्रकाराच्या प्रश्नावर कोहली भडकला

    टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. विश्वचषक सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली तेव्हा असा प्रश्न विचारण्यात आला की तो चिडला. एका पत्रकाराने टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित केला, तेव्हा विराटचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. Virat kohli got angry in press conference after loss against pakistan in t20 world cup 2021


    वृत्तसंस्था

    दुबई : टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. विश्वचषक सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. सामना संपल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली तेव्हा असा प्रश्न विचारण्यात आला की तो चिडला. एका पत्रकाराने टीम इंडियाच्या प्लेइंग-11 वर प्रश्न उपस्थित केला, तेव्हा विराटचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.

    पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने विराट कोहलीला विचारले की, टीम इंडियाच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, रोहित शर्माच्या जागी ईशान किशनला आणता आले असते का? या प्रश्नावर विराट कोहली आधी म्हणाला की, हा खूप धाडसी प्रश्न आहे.

    कर्णधार विराट कोहलीने पत्रकाराला विचारले, तुम्ही काय कराल, मी माझ्या सर्वोत्तम संघासोबत खेळलो आहे. तुम्ही रोहित शर्माला टी -20 संघातून वगळाल का? मागच्या सामन्यात त्याने काय केले माहीत आहे का? विराट पुढे म्हणाला की, तुम्हाला काही वाद हवा असेल तर थेट सांगा, मी तुम्हाला तेच उत्तर देईन.

    पाकिस्तानच्या पराभवानंतर विराट कोहली म्हणाला की, आम्ही आमचा प्लॅन नीट राबवला नाही, त्यामुळेच पाकिस्तानने आमचा पराभव केला. जेव्हा तुम्ही लवकर तीन विकेट गमावता, तेव्हा पुनरागमन करणे खूप कठीण होते. आम्हाला माहिती होते की, ते दव पडणार आहे, त्यामुळे दबाव होता.

    विराट कोहली म्हणाला की, पाकिस्तान आमच्यापेक्षा चांगला खेळला, ज्या प्रकारे परिस्थिती बदलली, आम्हाला आणखी 10-20 धावांची गरज होती. कर्णधार विराट कोहलीने मात्र हेदेखील सांगितले की हा आमच्यासाठी पॅनिक बटण मोड नाही, आताच स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे, ती संपलेली नाही.

    भारताने पाकिस्तानला 152 धावांचे लक्ष्य दिले होते, जे पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा प्रथमच पराभव केला. भारताची सलामी पूर्ण अपयशी ठरली आणि पहिल्याच चेंडूवर रोहित शर्मा शून्यावर बाद झाला.

    बाबर आझम विजयावर काय म्हणाला?

    पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला की, त्याच्या खेळाडूंनी प्रत्येक रणनीती चांगली राबवली आणि विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला जाते. आम्ही आमची रणनीती चांगली पार पाडली. शाहीन (शाह आफ्रिदी) ने ज्या प्रकारे सुरुवात केली, त्यामुळे आमचे मनोबल वाढले. फिरकीपटूंनी मधल्या षटकांमध्ये परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आणि आमच्या गोलंदाजांनी त्यांना डेथ ओव्हर्समध्ये मोकळेपणाने खेळू दिले नाही.

    आझम म्हणाला, ‘दव पडल्यामुळे चेंडू बॅटवर चांगला येत होता. आम्ही चांगली तयारी केली होती आणि आमच्या प्रत्येक खेळाडूने १०० टक्के योगदान दिले. ही फक्त स्पर्धेची सुरुवात आहे आणि आम्हाला आगामी सामन्यांनाही गांभीर्याने खेळावे लागेल.”

    Virat kohli got angry in press conference after loss against pakistan in t20 world cup 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!