• Download App
    पश्चिम बंगालमधील हिंसाचार लोकशाहीला कलंक, राज्यपाल जगदीप धनकर यांची टीका; हिंसा रोखण्यासाठी तरुणांना पुढाकार घेण्याचे आवाहन Violence in West Bengal stigmatizes democracy, criticizes Governor Jagdeep Dhankar; Appeal to youth to take initiative to prevent violence

    पश्चिम बंगालमधील हिंसाचार लोकशाहीला कलंक, राज्यपाल जगदीप धनकर यांची टीका; हिंसा रोखण्यासाठी तरुणांना पुढाकार घेण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था

    पुणे : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर उफाळून आलेल्या हिंसाचार हा लोकशाहीला कलंक असल्याची टीका पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी केली. आता हिंसाचार रोखण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. Violence in West Bengal stigmatizes democracy, criticizes Governor Jagdeep Dhankar; Appeal to youth to take initiative to prevent violence

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती अभिनव भारत व्यसपीठा’ ची स्थापना केली आहे. त्याचे उदघाटन जगदीप धनकर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.धनकर म्हणाले, देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असताना हिंसा करून कामगिरीचा नाश करणाऱ्या वृत्तीला रोखायलाच हवे. अशा लोकांना वठणीवर आणण्याचे काम तरुणच करू शकतात.



    हे सामर्थ्य केवळ तरुणांमध्येच आहे. या लोकांच्या विरोधात फक्त तरुणच उभे राहू शकतात. मी त्यांना मानवी हक्कांचे संरक्षण करण्यास सांगितले. मला आशा आहे की आजचा तरुण माझी विनंती ऐकेल.

    पश्चिमबंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, समाजात आणि लोकशाहीत आणि आपल्या संस्कृतीतही हिंसेला थारा नाही. पण, काही भागात अकारण आणि जाणूनबुजून हिंसाचार घडवून आणला जात आहे. तो रोखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे.

    Violence in West Bengal stigmatizes democracy, criticizes Governor Jagdeep Dhankar; Appeal to youth to take initiative to prevent violence

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार