विनायक ढेरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातले सरकार दुसऱ्या कार्यकालच्या उत्तरार्धात आणखी मजबूत होताना दिसत आहे. यामध्ये भाजप पक्ष म्हणून तर मजबूत होत आहेच, पण ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक एकांगी आणि ताठर राजकारणाचा आरोप लावतात, ते मोदी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए देखील अधिक मजबूत करत असल्याचे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. Vice presidential election : political flexible Narendra Modi makes NDA more powerful than so called United opposition in the country
450 ते 528 चा प्रवास
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून साधारण 440 ते 450 च्या आसपास खासदार असताना उपराष्ट्रपती पदाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनगड यांना 528 मध्ये मिळणे यातूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडी अधिक मजबूत झाल्याचे राजकीय संकेत स्पष्टपणे मिळाले आहेत. जगदीप धनगड पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय संबंध फारसे चांगले नव्हते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी धनगड यांच्या उमेदवारीला थेट पाठिंबा दिला नाही. मात्र त्यांनी तृणमूळ काँग्रेसचे खासदार त्यांनी तटस्थ ठेवले होते. त्यामुळे निवडणुकीत तब्बल 36 खासदार तटस्थ राहिले. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 7 खासदारांपैकी फक्त 3 खासदारांनी मतदान केले. उरलेले 4 खासदार मतदानालाच आले नाहीत. शिवाय ठाकरे गटाच्या 3 खासदारांचे मतदान जगदीप धनगड यांच्या पारड्यात पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेतला ठाकरे गट देखील विरोधी पक्षांच्या एकजुटीतून बाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
काँग्रेसचा ममतांवर मॅच फिक्सिंगचा आरोप
त्याचबरोबर काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्यावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केल्यानंतर ममता बॅनर्जी देखील काँग्रेस पासून अधिक दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी विरोधी पक्षांच्या महत्त्वाकांक्षी विरोधी ऐक्याची राजकीय महत्त्वाकांक्षा धुळीला मिळाला जमा आहे!!
वाजपेयी आणि मोदी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे अधिकृत रीत्या लोकसभा आणि राज्यसभा मिळून साधारण 450 खासदारांचे बहुमत असताना जगदीप धनगड यांना 528 मते मिळणे हे विरोधी आघाडीच्या राजकीय अपयशाचे ठळक उदाहरण ठरले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप तर मजबूत करू शकतातच पण राजकीय लवचिकता दाखवून लोकशाही आघाडी देखील मजबूत करू शकतात हे त्यांनी सिद्ध केले आहे. आत्तापर्यंत सगळे विरोधक अटल बिहारी वाजपेयी यांचे उदाहरण देऊन लवचिक राजकारणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “धडे” देण्याचा प्रयत्न करत होते. मोदी ताठर आहेत वाजपेयी लवचिक होते ते सर्वांची मैत्री राखून होते असे उपदेशाचे डोस विरोधक मोदींना पाजत असतात.
परंतु, आता मोदींनी ही लवचिकता बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून दाखवून देत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीश धनगड यांना 528 मते मिळवून दिली आहेत.
उपराष्ट्रपती निवडणूक निकाल
- लोकसभा आणि राज्यसभा मिळून 780 मतदारांपैकी 725 खासदार मतदारांचे प्रत्यक्ष मतदान.
- मतदानाचे प्रमाण 92.94%
- जगदीप धनगड : 528 मते
- मार्गारेट अल्वा : 182 मते
- खासदारांची तब्बल 15 मते बाद
- 36 खासदार तटस्थ
- शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या 4 खासदारांनी मतदानात सहभागच नोंदवलेला नाही.
- जगदीप धनगड 346 मतांनी विजयी
Vice presidential election : political flexible Narendra Modi makes NDA more powerful than so called United opposition in the country
महत्वाच्या बातम्या
- ममतांनी घेतली पीएम मोदींची भेट : पत्र देऊन मनरेगा, पीएम आवास आणि रस्ते योजनेसाठी निधीची मागणी
- ‘संसदेच्या अधिवेशनादरम्यान गुन्हेगारी प्रकरणात अटकेपासून खासदारांना सूट नाही’, नायडू यांचे खर्गेंना प्रत्युत्तर
- Common Wealth Games 2022 : बजरंग पुनियाने कुस्तीत जिंकले सुवर्णपदक, फायनलमध्ये कॅनडाच्या कुस्तीपटूला चारळी धूळ, अंशु मलिकला रजत
- 271 ग्रामपंचायती निवडणूकीचा सांगावा; गावांमध्येही हिंदुत्ववादी पक्षांचा बोलबाला!!; काँग्रेस – राष्ट्रवादीचे पाये उखडले!!