• Download App
    व्हायब्रंट गुजरातमध्ये रशियाच्या पंतप्रधानांसह पाच राष्ट्रांचे प्रमुख होणार सहभागी, देश-विदेशातील उद्योगपतीही लावणार हजेरी|Vibrant Gujarat will be attended by the heads of five nations, including the Prime Minister of Russia

    व्हायब्रंट गुजरातमध्ये रशियाच्या पंतप्रधानांसह पाच राष्ट्रांचे प्रमुख होणार सहभागी, देश-विदेशातील उद्योगपतीही लावणार हजेरी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गुजरातला उद्योगाच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेला रशियाच्या पंतप्रधानांसह पाच राष्ट्रांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर देश-विदेशातील उद्योगपती आणि कंपन्यांच्या प्रमुखांचीही उपस्थिती असणार आहे.Vibrant Gujarat will be attended by the heads of five nations, including the Prime Minister of Russia

    गुजरातमध्ये 10 ते 12 जानेवारी दरम्यान व्हायब्रंट गुजरात समीट होणार आहे. रशिया, मॉरिशस, नेपाळ आणि स्लोव्हेनियाचे पंतप्रधान आणि मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासह पाच राष्ट्रांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. एकूण 26 राष्ट्रे भागीदार देश या म्हणून शिखर परिषदेत भाग घेतील.



    2003 मध्ये शिखर परिषद सुरू झाल्यापासून ही सर्वाधिक संख्या आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्टिन, मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिप जॅसिंटो न्युसी, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि स्लोव्हेनियन पंतप्रधान जेनेझ जांसा यांचा यामध्ये समावेश आहे.

    या शिखर परिषदेत सहभागी झालेल्या २६ देशांमध्ये जर्मनी, फ्रान्स, इटली, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, यूके, यूएई, इस्रायल, सिंगापूर, स्वीडन, दक्षिण कोरिया, डेन्मार्क आणि फिनलँड यांचा सहभाग आहे.

    या शिखर परिषदेला उपस्थित राहणारे जागतिक बिझनेस टायकून आणि सीईओंमध्ये सुलतान अहमद बिन सुलेम (डीपी वर्ल्ड), डिडियर कॅसिमिरो (रोसनेफ्ट), टोनी फाउंटन (न्यारा एनर्जी लिमिटेड), तोशिहिरो सुझुकी (सुझुकी मोटर कॉपोर्रेशन), विवेक लाल (ग्लोबल अ‍ॅटोमिक्स ग्लोबल कॉपोर्रेशन) यांचा समावेश आहे. ),

    मेदा तदाशी (जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन), सलील गुप्ते (बोईंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) आणि विल्यम एल. ब्लेअर (लॉकहीड मार्टिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांचा समावेश आहे.

    भारताच्या बाजून् समिटमध्ये मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्री), गौतम अदानी (अदानी ग्रुप), केएम बिर्ला (आदित्य बिर्ला ग्रुप), सुनील भारती मित्तल (भारती एंटरप्रायझेस), अशोक हिंदुजा (हिंदुजा ग्रुप), एन. चंद्रशेखरन (टाटा ग्रुप) आणि हर्ष गोयंका हे सहभागी होणार आहेत.

    Vibrant Gujarat will be attended by the heads of five nations, including the Prime Minister of Russia

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Air Marshal : इंडियन आर्मीचा पाकला सज्जड दम; एअरस्ट्राइकवर एअर मार्शल म्हणाले- आमचे कवच कायम सक्रिय

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही