विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपूरम : केरळमधील कन्नूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि शासकीय धोरणे या विषयाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकांचा समावेश केल्याने राजकारण पेटले आहे. कॉँग्रेसने डाव्या आघाडीच्या सरकारवर शिक्षणाचे भगवेकरण केले जात असल्याचा आरोप केला आहे.Veer Savarkar and Golwalkar Guruji’s books included in the syllabus, Congress accuses communist government of deification of education
पदव्युत्तर विषयाच्या अभ्यासक्रमात विनायक दामोदर सावरकर आणि माधवराव सदाशिवराव गोलवलकर यांच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. सावरकरांचे हिंदुत्व: हिंदू कौन है आणि गोलवलकर गुरुजींचे बंच ऑ फ थॉट्स, वी ऑर अवर नेशनहुड डिफाइंडमधील काही भाग घेण्यात आला आहे. त्याचबरोबर दीनदयाल उपाध्याय यांचे पुस्तक एकात्म मानववाद आणि बलराज मधोक यांचे भारतीयकरण: क्या, क्यों और कैसे या पुस्तकातील काही भागही अभ्यासक्रमात सामील करण्यात आला आहे.
यावर कॉँग्रेसने विरोध केला असला तरी केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू यांनी त्याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अभ्यासक्रमाचा एक चांगला भाग हा या विचाराने तयार केलेला दिसतो की राजकीय विचार म्हणजे धर्म आणि जातीशी संबंधित विचार आहेत.अभ्यासक्रमात एमएस गोवलकर आणि वीर सावरकर सारख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रमुख विचारवंतांच्या पुस्तकांची शिफारस असल्याचे समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला.
मात्र, अभ्याक्रमात देशातील राजकीय विचारांच्या सर्व प्रवाहांना परवानगी दिली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्या सर्वांचे समीक्षात्मक परीक्षण करून निष्कर्षापर्यंत पोहोचू दिले पाहिजे. केवळ काही व्याख्येद्वारे राजकीय विचार मांडणे मर्यादित असेल. शिक्षण हे धर्मापासून वेगळे राहिले पाहिजे.
बिंदू म्हणाले की सरकारला विश्वास आहे की कन्नूर विद्यापीठ वादग्रस्त अभ्यासक्रमाची पुन्हा समीक्षा करेल आणि आवश्यकता भासल्यास त्यामध्ये बदल करेल.केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान म्हणाले जे लोक विविध विचारांना विरोध करतात त्यांचा पराभव निश्चित आहे. शिक्षण तुम्हाला योग्य किंवा अयोग्य काय याची ओळख करून देते. विविधता हा निसगार्चा नियम आहे. विविध विचारांच्या अभ्यासाला ज्यांचा विरोध असतो त्यांचेच त्यामुळे नुकसान होईल.
मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, सरकार देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा न देणाºया विचारांचा आणि नेत्यांचा गौरव करणार नाही.विद्यापीठाने वादग्रस्त पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यावर काँग्रेस पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग, केरळ स्टुडंट्स युनियन आणि मुस्लिम स्टुडंट्स फेडरेशनच्या विद्यार्थी शाखांनी कन्नूरच्या ब्रेनेन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये निदर्शने केली होती.
Veer Savarkar and Golwalkar Guruji’s books included in the syllabus, Congress accuses communist government of deification of education
महत्त्वाच्या बातम्या.
- तालिबानने दाखवला त्याच्या राजवटीचा ट्रेलर , मुली आणि महिलांवर कडक निर्बंध, अफगाण कलाकारही देश सोडून जात आहेत
- उध्दव ठाकरेंना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
- सर्वोच्च न्यायालय : कर्मचारी नियोक्त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी स्थानांतरित करण्यासाठी दबाव आणू शकत नाहीत
- ठाकरे सरकार महिलांबाबत असंवेदनशिल, दोन वर्षांपासून महिला आयोगाची स्थापना नाही, राष्ट्रीय महिला आयोगाचे ताशेरे
- मध्य प्रदेशात बीएच्या अभ्यासात आता महाभारत, रामचरितमानसचा समावेश, श्री रामचंद्र यांच्या अभियांत्रिकीचेही शिक्षण