Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात दररोज आढळणारी रुग्णसंख्या नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची ग्वाही दिली आहे. केंद्राच्या या निर्णयांचा परिणाम मे महिन्यापासून दिसून येईल. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अमेरिका, ब्रिटन, जपानच्या आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेल्या कोरोनावरील लसींना भारतात मंजूर करण्याची गरज नाही. त्या लगेच वापरता येऊ शकतील. US, UK, Japan vaccines soon available in India, says Amit Shah
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान देशात दररोज आढळणारी रुग्णसंख्या नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची ग्वाही दिली आहे. केंद्राच्या या निर्णयांचा परिणाम मे महिन्यापासून दिसून येईल. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अमेरिका, ब्रिटन, जपानच्या आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेल्या कोरोनावरील लसींना भारतात मंजूर करण्याची गरज नाही. त्या लगेच वापरता येऊ शकतील.
दुसरी लाट कमी प्राणघातक, पण संसर्गाचा वेग प्रचंड
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना गृहमंत्री शहा यांनी सोमवारी सांगितले की, केंद्र सरकारने कोरोनाची नवीन लाट रोखण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. जगात जिथे दुसरी आणि तिसरी लाट आली तिथे पहिल्या लहरीपेक्षा अडीच ते तीन पट जास्त तीव्रता आहे. पहिल्या लाटेपेक्षा अडीच ते तीन पट वेगवान आहे. यातील कोरोनाचे नवीन रूप कमी प्राणघातक आहे, परंतु तो पसरण्याचा वेग मात्र प्रचंड आहे. शास्त्रज्ञही यावर संशोधन करतच आहेत.
यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा
अमित शहा यांनी देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यावर भाष्य करताना म्हटले की, काही राज्ये ऑक्सिजनचा साठा करत आहेत, त्यांनी रुग्णांसाठीही हे केले पाहिजे. ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परंतु हे समान प्रमाणात वितरीत करण्यासाठी पंतप्रधानांनीही पुढाकार घेतला आहे. रेमडिसीव्हरच्या निर्यातीवर त्वरित बंदी घालण्यात आली होती आणि त्यापेक्षा तीनपट उत्पादन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर देशांतील लसी लवकरच भारतात
अमेरिका, ब्रिटन, जपान आणि डब्ल्यूएचओ यांनी मान्यता दिलेल्या लसी लवकरच भारतात उपलब्ध होतील. आम्ही लसीकरण सुविधादेखील वाढवत आहोत. या निर्णयांचा परिणाम मेच्या सुरुवातीस दिसून येईल. गृहमंत्री शाह यांनी स्पष्ट केले की, या निर्णयांचा आणि कोरोनाच्या प्रसाराचा कोणताही संबंध नाही, कारण विषाणू सातत्याने आपले स्वरूप बदलत आहे. यामुळे औषधांचा परिणामही कमी होतो.
US, UK, Japan vaccines soon available in India, says Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- संजय राऊत म्हणतात, ‘देशात युद्धसदृश परिस्थिती, कोरोनावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा!’
- WATCH : लॉकडाऊनच्या आधी दिल्लीत दारूसाठी झुंबड, महिला म्हणते – ‘इंजेक्शननं काही होत नाही, दारूनं होईल फायदा!’
- ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय
- Important Websites : आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय? मग या वेबसाइट जरूर पाहा
- WATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग