• Download App
    मुंबईत कोरोनाच्या लसीकरणाला तुफान वेग, तब्बल ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण | Vaccination drive is very fast in Mumbai

    मुंबईत कोरोनाच्या लसीकरणाला तुफान वेग, तब्बल ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मुंबईतील ८० टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून जवळपास ३० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.४५ वर्षांवरील ७३ टक्के नागरिकांचा पहिला डोस आणि ४७ टक्के नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. एक मार्चपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याने या वयोगटात दुसरा डोस घेण्याचे प्रमाण जास्त आहे, Vaccination drive is very fast in Mumbai

    तर दुसरा डोस घेण्यात सर्वात कमी प्रमाण हे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे आहे.मुंबई पालिकेला गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पावणेपाच लाख लशींचा पुरवठा राज्य सरकारमार्फत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे.



    राज्याकडून कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे मिळून ६३ लाख डोसउपलब्ध झाले आहेत; तर त्यापैकी जवळपास पावणेपाच लाख हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाले आहेत. जुलै महिन्यात नऊ लाख ८३ हजार, ऑगस्ट महिन्यात नऊ लाख ८६ हजार आणि सप्टेंबरच्या ६ तारखेपर्यंत चार लाख ७७ हजार डोस मिळाले आहेत.

    Vaccination drive is very fast in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला