CM Pushkar Singh Dhami Oath Ceremony : पुष्करसिंह धामी यांनी रविवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. शनिवारी झालेल्या भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत धामी यांच्या नावावर सहमती झाली होती. शपथ घेण्यापूर्वी धामी स्टेजवरून खाली उतरले आणि सतपाल महाराजांना भेटायला गेले. धामी यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे सतपाल महाराज संतप्त असल्याचे सांगितले जात होते. Uttrakhand New CM Pushkar Singh Dhami Oath Ceremony Updates
विशेष प्रतिनिधी
डेहराडून : पुष्करसिंह धामी यांनी रविवारी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी त्यांना शपथ दिली. शनिवारी झालेल्या भाजप विधिमंडळ गटाच्या बैठकीत धामी यांच्या नावावर सहमती झाली होती. शपथ घेण्यापूर्वी धामी स्टेजवरून खाली उतरले आणि सतपाल महाराजांना भेटायला गेले. धामी यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे सतपाल महाराज संतप्त असल्याचे सांगितले जात होते.
मुख्यमंत्री झाल्यानंतर सतपाल महाराज, हरकसिंग रावत, डॉ. धनसिंग रावत, बन्सीधर भगत, यशपाल आर्य, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, बिशनसिंग, गणेश जोशी, रेखा आर्य आणि यतिश्वरानंद यांना पदाची शपथ दिली गेली. मंत्री झालेल्या सर्व आमदारांचा यापूर्वी मंत्रिमंडळात समावेश होता.
कधी मंत्रीही नव्हते, धामी थेट मुख्यमंत्रिपदी
पिथौरागडमध्ये जन्मलेले 45 वर्षांचे पुष्करसिंह धामी हे राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. दोन वेळा आमदार राहिलेले धामी उत्तराखंड सरकारमध्ये कधी मंत्रीही झाले नव्हते, परंतु आता ते थेट मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारतील. शनिवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा आभारी आहे. बहुमत असूनही नेतृत्वाच्या अस्थिरतेबरोबर सतत संघर्ष करत असलेल्या भाजपने मुख्यमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला होता.
शुक्रवारी तीरथसिंग रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर शनिवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. नरेंद्रसिंह तोमर आणि डी. पुरंदेश्वरी यात केंद्रीय निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीत तीरथसिंग रावत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी खटिमाचे आमदार पुष्करसिंग धामी यांचे नाव प्रस्तावित केले. यावर केंद्रीय पर्यवेक्षकाच्या संमतीनंतरही दुसरे नाव प्रस्तावित झाले नव्हते.
Uttrakhand New CM Pushkar Singh Dhami Oath Ceremony Updates
महत्त्वाच्या बातम्या
- पदासाठी चळवळ करणं कोणाच्याही मनात येऊ नये, छत्रपती संभाजीराजेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- Aamir Khan Divorce : घटस्फोटानंतर आमिर – किरण यांची पहिली प्रतिक्रिया, चाहत्यांना दिला हा संदेश
- प. बंगालमध्ये लसीकरण केंद्रावर तृणमूल नेत्याचे अघोरी कृत्य, पोझच्या नादात नर्सकडून लस हिसकावून स्वत : च महिलेला टोचली
- केंद्रीय कृषी कायद्यांच्या बाजूने पवार, पण काँग्रेसला वाटतेय अडचण; थोरात म्हणाले – राज्यासाठी आम्ही दुसरा कायदा आणणार!
- तरुण नैराश्यात जात आहेत, स्थगित MPSC परीक्षा त्वरित घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या – रोहित पवार