• Download App
    अमेरिकेनंतर बाेस्टनचे भारतात सर्वात माेठे संशाेधन केंद्र|USA Medical Company Boston scientific corporation open there R&D center in pune

    अमेरिकेनंतर बाेस्टनचे भारतात सर्वात माेठे संशाेधन केंद्र

    अमेरिकेतील बाेस्ट सायंटिफिक काॅर्पाेरेशनने अमेरिकेनंतर भारतात कंपनीचे सर्वात माेठे संशाेधन केंद्र (आर अँड डी) निर्माण करण्याचे ठरवले आहे. गुरगाव येथे पहिले संशाेधन केंद्र निर्माण केल्यानंतर पुण्यात दुसरे अत्याधुनिक संशाेधन केंद्र पुण्यात सुरु करण्यात आले आहे.


    प्रतिनिधी 

    पुणे -अमेरिकेतील बाेस्ट सायंटिफिक काॅर्पाेरेशनने अमेरिकेनंतर भारतात कंपनीचे सर्वात माेठे संशाेधन केंद्र (आर अँड डी) निर्माण करण्याचे ठरवले आहे. गुरगाव येथे पहिले संशाेधन केंद्र निर्माण केल्यानंतर पुण्यात दुसरे अत्याधुनिक संशाेधन केंद्र सुरु करण्यात आले असून भारतातील संशाेधनात अधिक प्रमाणात गुंतवणुक करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.निती आयाेगाचे सदस्य डाॅ.विनाेद पाॅल,बाेस्टन सायंटिफिकचे कार्यकारी उपाध्यक्ष आर्ट बुचर, कराल्फ कार्डिनल, संजीव पांडया, मनाेज माधवन यांच्या उपस्थितीत नवीन केंद्राचे उदघाटन करण्यात आले.USA Medical Company Boston scientific corporation open there R&D center in pune

    बाेस्टन सायंटिफिक ही अमेरिकेतील मेडिकल डिवाईस कंपनी असून भारतात २०१४ साली त्यांनी गुरगाव येथे कंपनीचे पहिले संशाेधन केंद्र सुरु करण्यात आले. आतापर्यंत सदर केंद्राच्या माध्यमातून संशाेधन करुन १००पेक्षा अधिक पेटंट प्राप्त करण्यात आले आहे.



    पुण्यातील दुसरे संशाेधन केंद्रात १७०पेक्षा अधिक अभियंताना राेजगार निर्माण हाेणार आहे. ७० हजार चाैरस फूट जागेवर विस्तारीत या संशाेधन केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे व सिम्युलेटर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

    यावेळी राल्फ कार्डिनल म्हणाले, जगभरातील रुग्णांना साहय करणारे वैद्यकीय तंत्रज्ञान व उपाययाेजना विकसित करण्यासाठी वैद्यकीय संशाेधनात गुंतवणुक करणे महत्वपूर्ण आहे. बाेस्टनच्या माध्यमातून दरवर्षी संशाेधनाकरिता एक बिलीयन युएस डाॅलरची गुंतवणुक करण्यात येते.

    नवीन संशाेधन केंद्रात इंटरवेन्शनल कार्डियाेलाॅजी, पेरिफेरल इंटरवेन्शन्स, कार्डियक,रिदम मॅनेजमेंट, एण्डाेस्काेपी, न्युराेमाॅडयुलेशन आणि युराेलाॅजी व पेल्विक हेल्थ आदी वैद्यकीय क्षेत्रात संशाेधनावर भर देण्यात येणार आहे. यामाध्यमातून जगभरातील रुग्णांच्या गरजांची पूर्तता हाेईल.

    USA Medical Company Boston scientific corporation open there R&D center in pune

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र