वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा सिरियातील दहशतवादी अड्ड्यावर काल पुन्हा हवाई हल्ला केला. त्यात अल कायदाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल हामिद हा ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. US airstrikes in Syria kill al-Qaeda’s most wanted Abdul Hamid drone strike
सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी यांनी शुक्रवारी या हल्ल्याची पुष्टी केली. उत्तर पश्चिमी सीरियामध्ये अमेरिकन सैन्यानं केलेल्या हवाई हल्ल्यात अल कायदाचा म्होरक्या अब्दुल हामिद अल-मातर मारला गेला आहे. रिग्सबी यांनी सांगितलं की, हवाई हल्ल्यासाठी एमक्यू-९ विमानाचा वापर केला. हल्ल्यात कोणताही नागरिक दगावला नाही.
रिग्सबी म्हणाले, अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसाठी अल कायदाकडून नेहमीच धोकदायक आहे.दहशतवादी संघटना सीरियाचा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापर करून दहशतवादी कारवायांचा कट आखते.
अल कायदाच्या योजनांवर पाणी
अल-कायदाच्या म्होरक्याची हत्या झाल्याने दहशतवादी संघटनेच्या जागतिक हल्ल्यांच्या काटावर पाणी फिरले आहे. आता अमेरिकन नागरिक, आमचे मित्रराष्ट्र आणि निष्पाप लोकांचे छळ थांबतील, अशी आशा आहे, असं रिग्सबी यांनी सांगितलं. अमेरिकी भूमीला नुकसान पोचविण्याचे षडयंत्र हाणून पाडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
सप्टेंबरमध्ये सुद्धा हल्ला
याआधीही २० सप्टेंबर रोजी अमेरिकेनं सीरियाच्या इदलिब शहरामध्ये हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात अलकायदा नेता सलीम अबू-अहमद मारला गेला होता. सलीम हा अल कायदामध्ये प्लान बनवणे आणि फंडिंगचा वापर करण्याचं काम करायचा. त्याआधी दक्षिण सीरियात अमेरिकेच्या चौकीवर केलेल्या हल्ल्याचा हा बदला होता.
US airstrikes in Syria kill al-Qaeda’s most wanted Abdul Hamid drone strike
महत्त्वाच्या बातम्या
- सैतानाचा अवतार समजून महिलेला नग्न पूजा करायला भाग पाडून बळी देण्याचा प्रयत्न
- हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने पंतप्रधानांचा राजीनामा, माफियांचे षड्यंत्र असल्याचा आरोप
- समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, किरीट सोमय्या यांचा नबाब मलिक यांना इशारा
- योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन घुसला एक जण, चार पोलीस निलंबित
- पाकिस्तानने अफगाणिस्तानवर कब्जा करून गरीबी आणि गुलामीत ढकलले, अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचा आरोप