• Download App
    हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने पंतप्रधानांचा राजीनामा, माफियांचे षड्यंत्र असल्याचा आरोप|PM resigns after video of him masturbating comes to light

    हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने पंतप्रधानांचा राजीनामा, माफियांचे षड्यंत्र असल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    सायप्रस : हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने उत्तर सायप्रस देशाच्या पंतप्रधानाना राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र हे माफियांचे षड्यंत्र असल्याचा आरोप पंतप्रधान इरसान सानेर यांनी केला आहे.PM resigns after video of him masturbating comes to light

    सायप्रसमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत ५४ वर्षीय इरसान सानेर यांचा पक्षच त्यांच्या विरोधात गेला आहे.कारण त्यांच्या पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र, सानेर यांनी निवडणुकीनंतरही राजकारण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अशा प्रकारचा अडचणीत टाकणारा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांची राजकीय कारकीर्द यामुळे संकटात सापडली आहे.



    या व्हिडिओमध्ये एक तरुणी आपल्या अंगावरचे कपडे क्रमाक्रमाने काढत आहे, ज्याला स्ट्रीप टीझ करणे म्हणतात. पंतप्रधान सानेर हे हस्तमैथुन करताना दिसत आहेत. मात्र सानेर यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. सानेर म्हणाले की हा व्हिडिओ माझा नाही.

    कोणीतरी माझ्या देशाची, पक्षाची सेवा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. राजकीय मार्गाने आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही म्हटल्यावर ते अशा पद्धतीने हल्ले माझ्यावर करत आहेत. हे माफियांचं षडयंत्र असून हा हल्ला केवळ आपल्यावर नसून आपल्या कुटुंबावर, पक्षावर आणि राजकीय संस्थावर आहे. आपण कायदेशीर सल्लागारांबरोबर चर्चा करत आहोत.

    PM resigns after video of him masturbating comes to light

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Trump : ट्रम्प यांनी होर्मुझमधील 20% कर आकारण्याचा निर्णय मागे घेतला; इराणने उपहास करत म्हटले- आम्ही थोडे कमी घेऊ

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये 15 भारतीयांच्या मृत्यूनंतर बोट-कॅप्टनला अटक; कंपनीच्या रिवॉर्ड ट्रिपवर पर्यटक गेले होते; कुटुंबांना टीव्हीवरून बातमी मिळाली

    South China Sea : दक्षिण चीन समुद्राबाबत 14 देशांच्या निवेदनावर चीन संतापला; जपानी राजदूताला म्हटले- सागरावरील आमचे सार्वभौमत्व कधीही बदलले नाही