विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता युनायटेड एअरलाइन्सने दिल्लीचे सर्व उड्डाणे रद्द केले आहेत. काल दिल्लीच्या विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी करण्याचे सांगितले असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे युनायटेड एअरलाइन्सचे विमान प्रवाशांविनाच न्यूयॉर्ककडे परत झेपावले.United Airlines cancelled its service in India
दिल्ली विमानतळावरुन रिकामे विमान परत नेण्यासंदर्भात युनायटेड एअरलाइन्सने कोणतेही कारण सांगितले नाही. युनायटेड एअरलाइन्सकडून उड्डाण रद्द होण्याचे कारण प्रवाशांना मोबाईलवर संदेशाद्वारे पाठवण्यात आले आहे.
त्यात म्हटले की, दिल्लीहून २३ एप्रिलची युनायटेड एअरलाइन्सची फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. भारताच्या अधिकाऱ्यांबरोबर कोविड-१९ प्रवासी नियमांवर चर्चा करण्याची गरज आहे. या प्रश्नाडवर तोडगा काढण्याचे काम केले जात असून लवकरच तो निकाली निघेल, अशी आशा आहे.
युनायटेड एअरलाइन्सच्या निवेदनात म्हटले की, आम्हाला भारताच्या कोविड नियमातील स्पष्टता हवी आहे. त्यामुळे हवाई सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. तसेच विमान सेवा लवकरात लवकर बहाल करण्याबाबत योजना आखत आहोत, असेही नमूद केले.
United Airlines cancelled its service in India
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Updates In India : देशात कोरोनाचा स्फोट! २४ तासांत ३.४९ लाख रुग्णांची नोंद, २७६७ मृत्यू
- AIIMS च्या उभारणीत मोदी सरकार सर्वात पुढे, घोषणा केलेल्या १४ पैकी ११ एम्स कार्यरत, मनमोहन सरकारने उभारले फक्त एक
- रेल्वेतर्फे 5600 आयसोलेशन कोच ; कोरोना रुग्णांवर उपचार, क्वारंटाईनसाठी वापर
- रोगप्रतिकार शक्तीत महिला अव्वल, मुंबईतील सर्वेक्षण; उंच इमारतीतील रहिवासीही सुरक्षित
- मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता; सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटही