- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (UPSC) घेण्यात येणारी सनदी अधिकारी पदाची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकसेवा आयोगाने २७ जून रोजी होणारी नागरी सेवा प्राथमिक परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला आहे. गुरुवारी याबाबत परिपत्रक काढण्यात आलं. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचं यूपीएससीकडून सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय लोकसेवा आयोगाकडून २७ जून रोजी IAS, IPS आणि IFS अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्राथमिक(Preliminary) परीक्षा आयोजित केली होती.याबाबतची सविस्तर माहिती यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. Union Public Service Commission postpones CSE Prelims 2021 to 10th October
UPSC कडून भारतीय प्रशासकीय सेवा(IAS), भारतीय पोलीस सेवा(IPS) आणि भारतीय विदेश सेवा(IFS) मध्ये अधिकारी निवड करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेते. ग्रुप ए आणि ग्रुप बी असे एकून ७१२ पदं नागरी सेवा अंतर्गत परीक्षा घेऊन भरली जाणार होती.
गेल्या वर्षीही कोरोना व्हायरसमुळे यूपीएससीच्या वार्षििक वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. काही परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या होत्या. यंदाही परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दरवर्षी जूनमध्ये होणारी पूर्व परीक्षा यंदा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार आहे.