• Download App
    ठाकरे - पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट?? Uddhav Thackeray - sharad Pawar meeting, is there any political surprise element??

    ठाकरे – पवार सिल्वर ओकवर भेट; महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा की काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पवारांचे निवासस्थान सिल्वर झालेली भेट ही महाविकास आघाडीतील मतभेदांवर चर्चा करून ते मिटवण्यासाठी होती की त्यात काही पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट वर चर्चा झाली??, अशी राजकीय वर्तुळात शंका व्यक्त होत आहे. Uddhav Thackeray – sharad Pawar meeting, is there any political surprise element??

    महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या राजवटीत आणि त्यानंतर ज्यावेळी महाविकास आघाडीच्या समन्वयासाठी बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, अजितदादा पवार, काँग्रेस कडून अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते सहभागी असायचे. त्यात शिवसेनेकडून संजय राऊत यांची देखील भर असायची पण समन्वयाच्या बैठकीत क्वचितच खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या होत्या.

    पण आजच्या सिल्वर ओक मधल्या बैठकीत उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याबरोबर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे हे दोनच नेते उपस्थित होते. सुमारे दीड तास चाललेल्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे पत्रकारांची न बोलता निघून गेले. त्यामुळेच ठाकरे – पवार यांची भेट ही महाविकास आघाडीत सध्या तयार झालेल्या वेगवेगळ्या मतभेदांच्या मुद्द्यांवर होती की त्यापलिकडे जाऊन महाराष्ट्रात कोणते पॉलिटिकल सरप्राईज एलिमेंट तयार करण्यासाठी होती??, याविषयीचा संशय वाढतो आहे.


    1. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताना विश्वासात घेतले नाही; शरद पवारांचा महाविकास आघाडीत नवा राजकीय बॉम्ब गोळा

    काहीच दिवसांपूर्वी “अचानक” बारामती लोकसभा मतदारसंघा संदर्भात एक बातमी आली होती. भूमाता संघटनेच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी भाजप पासून राष्ट्रवादी पर्यंत कुठल्याही पक्षातून बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. त्यांची “अचानक” उद्भवलेली इच्छा यातून सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीतून “एस्केप रूट” तयार होतेय का??, असा संशय निर्माण झाला आहे.

    त्यापुढे जाऊन सुप्रिया सुळे आता लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, तर विधानसभेची निवडणूक लढवू शकतील अशी राजकीय वर्तुळात दबक्यावर आवाजात चर्चा व्हायला लागली.

    त्यामुळेच महाविकास आघाडी काय मतभेद असायचे ते असू द्यात. त्यापेक्षा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये समन्वय साधून भविष्यातील महापालिका, लोकसभा आणि विधानसभा अशा निवडणुका एकत्र लढविणे आणि त्यामध्ये सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांचे संयुक्त नेतृत्व असणे याविषयीची कोणती ठाकरे – पवारांमध्ये सिल्वर ओक वर चर्चा झाली आहे का??, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

    पवारांचे छोटे-मोठे धक्का तंत्र

    सत्तेचे राजकारण करताना पवार मधल्या काही टप्प्यांवर छोटी-मोठे धक्का तंत्रे वापरत असतात. आर. आर. आबांचे प्रदेशाध्यक्ष पद त्यानंतर उपमुख्यमंत्री पद तसेच 2019 मध्ये अनिल देशमुखांकडे गृहमंत्री पद सोपविणे, अशी छोटी धक्का तंत्रे पवारांनी आधी वापरली आहेत. त्यापुढे जाऊन सुप्रिया सुळे यांच्या पॉलिटिकल करिअरला निर्णायक वळण देण्याच्या दृष्टीने ठाकरे – पवार यांच्यात सिल्वर ओक वर चर्चा झाली आहे का??, याविषयी आता दाट संशय तयार झाला आहे.

    Uddhav Thackeray – sharad Pawar meeting, is there any political surprise element??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के