• Download App
    उध्दव ठाकरे अपघाती मुख्यमंत्री, महाविकास नव्हे महाविश्वासघातकी सरकार, प्रकाश जावडेकर यांची टीका|Uddhav Thackeray Accidental Chief Minister, not Mahavikas but treacherous government, Prakash Javadekars Criticism

    उध्दव ठाकरे अपघाती मुख्यमंत्री, महाविकास नव्हे महाविश्वासघातकी सरकार, प्रकाश जावडेकर यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उद्धव ठाकरे हे अपघाती मुख्यमंत्री आहेत, महाविकास आघाडीचे नव्हे तर हे महाविश्वासघातकी सरकार असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
    पत्रकारांशी बोलताना जावडेकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री आहे, राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली,Uddhav Thackeray Accidental Chief Minister, not Mahavikas but treacherous government, Prakash Javadekars Criticism

    पण केंद्राने केलेली कामेही त्यांनी आपल्या खात्यात मांडली. हे संधीसाधू सरकार आहे.मी नवे नाव देत आहे, महा विश्वासघातकी आघाडी सरकार, असे सांगून जावडेकर म्हणाले, अनेक मंत्र्यांचे कारनामे बाहेर आले, काही मंत्र्यांनी जावयाला कंत्राट दिले, काही मंत्र्यांनी दाऊदशी संबंधित मालमत्ता घेतली.राज्यात भ्रष्टाचार आहे, कायदा सुव्यवस्था नाही.



    गृहमंत्री 6 महिने फरार होते, आणि आता जेलमध्ये ते गेले, असे कोणते राज्य आहे?महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनीही सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात जबाबदारी होती, त्याच राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

    अटकेच्या भीतीने लपवावे लागले. आता ते सीबीआयच्या कोठडीत आहे. सचिन वाझे निलंबित असताना त्याला सेवेत घेण्यात आले. वाझेला पुन्हा सेवेत घेण्याला मुख्यमंत्रीही जबाबदार आहेत. कोरोनाच्या काळात सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, कोरोनासाठीच्या उपाययोजनासाठीच्या 600 कोटींचा निधी तिजोरीत पडून आहे.

    तरीही महाविकास आघाडी सरकार केंद्राकडेच बोट दाखवत असते. लस म्हटले की केंद्र, व्हेटिंलर म्हटले की केंद्र. मग या सरकारची जबाबदारी नेमकी आहे तरी काय? त्यामुळे कोरोनासह सर्वच विषयात हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे लोकांना ज्या-ज्या वेळेला संधी मिळेल, त्यावेळी लोक हे सरकार फेकून देतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

    Uddhav Thackeray Accidental Chief Minister, not Mahavikas but treacherous government, Prakash Javadekars Criticism

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Jaishankar : युरोपकडून मदतीच्या प्रश्नावर परराष्ट्रमंत्र्यांचा निशाणा, जयशंकर म्हणाले- आम्हाला उपदेशकांची नव्हे तर सहयोगींची गरज

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    Himanta Biswa Sarma : आसामात पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या दोघांना अटक; पहलगाम हल्ल्यानंतर 39 जण ताब्यात