• Download App
    पाकिस्तानसाठी तस्करी करणाऱ्या दोन लष्करी जवानांना अटक, मादक पदार्थांच्या तस्करीची चौकशी करताना दोघे जाळ्यात|Two Pakistani soldiers arrested for smuggling drugs into Pakistan

    पाकिस्तानसाठी तस्करी करणाऱ्या दोन लष्करी जवानांना अटक, मादक पदार्थांच्या तस्करीची चौकशी करताना दोघे जाळ्यात

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे जाळे पोलीसांनी उध्वस्त केले असून पंजाब पोलिसांनी मंगळवारी लष्कराच्या दोन जवानांना अटक केली आहे. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) एजन्सीला गुप्त कागदपत्रे पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.Two Pakistani soldiers arrested for smuggling drugs into Pakistan

    पोलीस अधीक्षक नवीन सिंगला यांच्या नेतृत्वाखाली जालंधर ग्रामीण पोलिस नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेंन्स (एनडीपीएस) प्रकरणाचा तपास करत होते. यावेळी त्यांना हेरगिरीसाठीची गुप्त कागदपत्रे सापडली. हरप्रीत सिंग (वय 23) गुरभिजसिंग (वय 23) अशी या दोघांची नावे आहेत.



    हरप्रीत सिंग हा अमृतसरमधील चेचा गावचा असून तो अनंतनाग येथे तैनात होता. तो २०१५ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाला. १९ राष्ट्रीय रायफल्समध्ये तो कार्यरत आहे. आहेत. गुरभिजसिंग तो मूळचा तरण तारणमधील पुणियां गावचा असून तो 18 शिख लाईट इन्फंट्रीमध्ये काम करत आहे. कारगिल येथे लिपीकाचे काम करत होता.

    पोलिस महासंचालक (डीजीपी), दिनकर गुप्ता यांनी सांगितले की, एसडीएस नवीन सिंगला यांच्या नेतृत्वात जालंधर ग्रामीण पोलिसांनी एनडीपीएस प्रकरणाची चौकशी केली. यावेळक्ष गोपनीय आणि गुप्त कागदपत्रे जप्त केली.

    रणवीर सिंग नावाच्या एकाला भारतीय लष्कराने 24 मे 2021 रोजी 70 ग्रॅम हेरॉईनसह अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान रणवीरने सांगितले की हरप्रीतसिंग हा त्याचा मित्र होता आणि ते दोघे एकाच गावातले असल्याने सिप्पो रणवीरने हरप्रीतसिंगला पैशाचे आमिष दाखविले. त्याच्याकडून गुप्त कागदपत्रे मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

    हरप्रीत याने आपला मित्र गुरुभिजसिंगला यासाठी तयार केले. तो १२१ इन्फंट्री ब्रिगेड मुख्यालयात लिपिक म्हणून काम करत असल्यान त्यांच्याकडे भारतीय लष्कराशी संबंधित संरक्षण आणि युध्दनितीची गुप्त कागदपत्रे होते.

    अटक केलेल्या दोन्ही लष्कराच्या जवानांनी आतापर्यंत फेब्रुवारी ते मे २०२० दरम्यान रणवीर सिंग याला देशाच्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात १०० हून अधिक गुप्त कागदपत्रांचे फोटो शेअर केले होते. ही कागदपत्रे पाकिस्तानी गुप्तचर अधिकाºयांना पुरविण्यात आली.

    रणवीर ही कागदपत्रे थेट पाकिस्तान आयएसआयच्या हेरांकडे पाठवित होता. अमृतसरमधील डाऊके गावातून त्याचा अंमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसायही सुरू होता. त्यामुळे पाकिस्तानातील अंमली पदार्थांच्या रॅकेटशी आणि आयएसआयशी त्याचे संबंध होते.

    प्राथमिक चौकशीनुसार डीजीपी दिनकर गुप्ता म्हणाले की, हरप्रीतसिंग आणि गुरभिजसिंग यांना आयएसआयकडून गोपनीय माहित दिल्याबद्दल पैसे मिळत होते. रणवीर सिंह हरप्रीतसिंगला पैसे देत असे,तो हे पैसे गुरुभिजसिंगच्या खात्यात जमा करत असे

    Two Pakistani soldiers arrested for smuggling drugs into Pakistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!